संशयित गुन्हेगार भोगतायत शिक्षेआधीच मरण यातना

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 29 जून 2018

पारनेर (नगर) : सुपे येथे पोलीस कोठडीची सोय होऊन सुमारे 10 वर्ष झाली मात्र ती अद्यापही रिकामीच. मात्र पारनेरच्या पोलीस कोठडीत असणारे 40 हुन अधिक संशयीत गुन्हेगार भोगतायत न्यालयाच्या शिक्षे अगोदरच मरण यातना. पारनेरला आरोपी ठेवण्यासाठी हव्यात आणखी खोल्या.

पारनेर (नगर) : सुपे येथे पोलीस कोठडीची सोय होऊन सुमारे 10 वर्ष झाली मात्र ती अद्यापही रिकामीच. मात्र पारनेरच्या पोलीस कोठडीत असणारे 40 हुन अधिक संशयीत गुन्हेगार भोगतायत न्यालयाच्या शिक्षे अगोदरच मरण यातना. पारनेरला आरोपी ठेवण्यासाठी हव्यात आणखी खोल्या.

पारनेर तालुक्यातील 131 गावांसाठी दोन पोलीस ठाणी व दोन दूरक्षेत्र आहेत. दोन स्वतंत्र पोलीस ठाणे असल्याने त्यांचा कारभारही स्वतंत्रपणे चालतो मात्र सर्व आरोपी पारनेरच्या पोलीस कोठडीत एकत्रीत ठेवले जातात. त्यामुळे तेथे गर्दी होते. आरोपींना न्यालयाने शिक्षा सुनावण्या आगोदरच त्यांना येथे शिक्षा भोगावी लागते. पारनेरला एकत्रीत चार खोल्या आहेत त्यात संशियीत आरोपी, पोलीस कोठडीतील आरोपी, तसेच न्यालयीन कोठडीतील आरोपी ठेवल जातात. येथे असणार्या चार खोल्या पैकी एका खोलीत महिला आरोपी ठेवले जातात उर्वरीत तीन खोल्यात पुरूष आरोपी ठेवतात.

सध्या या तीन खोल्यामध्ये 36 पुरूष तर एका खोलीत तीन महिला आरोपी आहेत. येथील कोठडीत सरासरी 40 ते 50 आरोपी नेहमी असतात. या आरोपींमध्ये पारनेर पोलीस ठाणे व सुपे पोलीस ठाणे अंतर्गत सर्व आरोपी ठेवले आहेत. वास्तविक नियमानुसार एका खोलीत सहा आरोपी ठेवणे  बंधनकारक आहे मात्र केवळ खोल्याची कमतरता असल्याने एका खोलीत दुप्पटीपेक्षा अधिक व नियमबाह्य आरोपी ठेवले जात आहेत. 

क्षमतेपेक्षा अधिक आरोपी ठेवल्याने पोलीस यंत्रणेवर ताण येतो तसेच आरोपींना सुविधा देणे कठीण होते. मात्र पर्याय नसल्याने व आरोपींनाही तक्रार करण्यास संधी न दिल्याने हे आरोपी मरण यातणा सहन करत आहेत.

सुपे पोलीस ठाण्यात सुमारे 10 वर्षापासून अद्यावत पोलीस कोठडी आहे तरी सुद्धा केवळ तिची अधिकृत तपासणीव मान्यता न घेतल्याने ती गेली अऩेक वर्षापासून आरोपींची वाट पहात तशीच मोकळी आहे.

पारनेर सह सुपे येथील आरोपी आम्हालाच सांभाळावे लागतात आमच्याकडे पोलीसांचे संख्याबळ व कोठडींची संख्याही कमी आहे. शिवाय गावे 101 आहेत तसेच  पोलीस कोठडीची जबाबदारी आमच्यावरच येते सुपे पोलीस ठाण्याचे आरोपीच नेहमी निम्मे  असतात मात्र त्यांचा एकच पोलीस येथे संरक्षणासाठी मिळतो.
-हनुमंतराव गाडे, पोलीस निरीक्षक, पारनेर

आमच्या पोलीसकोठडीला अधिकृत मान्यता नाही त्यामुळे व सबजेल पारनेर असल्याने येथे आरोपी ठेवता येत नाहीत शिवाय आमच्याकडे पोलीस संख्या बळ कमी आहे. शिवाय न्यायालय पारनेर येथे आहे कोठडी सुरू झाली तर आमचे निम्मे पोलीस तेथेच लागतील मग इतर कामे कशी करणार.
- राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, सुपे.

Web Title: bad conditions of jail in parner nagar