... अन्‌ कोपरगावच्या आजोबाला परत मिळाली बॅग!

परशुराम कोकणे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

- पोलिसांच्या तत्परतेचे आणि रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक 
- वायरलेसवरुन गस्तीवरच्या पोलिसाला कॉल 
- बॉगेत 10 हजाराची रोकड, एक तोळा सोने, पाच साड्या

सोलापूर : नातेवाइकांच्या लग्नासाठी सोलापुरात आलेल्या आजोबांची गडबडीत रिक्षात बॅग विसरली. त्या बॅगेत 10 हजारांची रोकड, एक तोळा सोने, आहेरसाठीच्या पाच साड्या होत्या. घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी काही वेळातच रिक्षाचालकाचा शोध घेऊन आजोबांना बॅग परत केली. या घटनेनंतर पोलिसांच्या तत्परतेचे आणि रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. 

हेही वाचा : अबब! भाकरी महागली; शाळू दरात इतकी वाढ 

यासाठी आजोबा आले होते सोलापूरात 
रामचंद्र शंकर शेंडगे (रा. कोपरगाव, जि. नगर) हे आपल्या कुटुंबीयांसोबत नातेवाइकाच्या लग्न समारंभासाठी मंगळवारी सोलापुरात आले होते. शिवाजी चौकातील बस स्थानकावरून ते रिक्षाने आसरा चौकात आले. गडबडीत त्यांनी रिक्षामध्ये आपली बॅग विसरली. घाबरलेल्या श्री. शेंडगे यांनी आसरा चौकात ड्यूटीवर असलेल्या पोलिस शिपाई प्रवीण पवार यांना रिक्षात बॅग विसरली असल्याचे सांगितले. त्यानंतर पवार यांनी लागलीच वायरलेसवरून गस्तीवर असलेल्या पोलिस शिपाई अनिल बनसोडे आणि प्रभाकर आडद यांना कॉल दिला. 

हेही वाचा : दिवसाढवळ्या पोलिसावर झाडली गोळी 

फोनवरुन संपर्क 
पोलिस शिपाई बनसोडे आणि आडद हे दोघेही आसरा चौकात आले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन होटगी रोडवरील काही रिक्षाचालकांशी फोनवरून संपर्क करून घटनेची माहिती दिली. पिवळा शर्ट घातलेल्या रिक्षाचालकाची विचारपूस करण्यात आली. काही वेळातच रिक्षाचालक सुनील माने यांच्याशी संपर्क झाला. रिक्षाचालक माने हे सुद्धा श्री. शेळके यांचा शोध घेत होते. तासाभरात पोलिसांच्या मदतीने श्री. शेंडगे यांची बॅग परत मिळाली. याबाबत त्यांनी कर्तव्यतत्पर पोलिसांचे आणि प्रामाणिक रिक्षाचालकाचे आभार मानले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bag was returned grandfather