बहुजन समाज सत्ताधारी बनणारच - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नगर - मूठभरांकडे सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे सत्तेचे सार्वत्रिकीकरण व सामाजिकीकरण झाले पाहिजे. त्यासाठी आता बहुजन समाज सत्ताधारी बनणार आहे. संविधान वाचवण्याबरोबरच आमचे प्रश्‍न आम्हीच सोडविणार, असा विश्‍वास भारिप बहुजन महासंघाचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या सभेत व्यक्त केला.

आंबेडकर म्हणाले, 'जनतेचा सत्ताधाऱ्यांवरील विश्‍वास संपू लागला आहे. सत्ताधाऱ्यांनी सामान्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आम्ही समान आहोत, ही भावना सर्वांनी स्वीकारावी.

लोकशाहीत निवडून दिलेली व्यक्‍ती आपला मालक नसतो, तर नोकर असतो. वंचितांना येत्या लोकसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्य आणि जिल्ह्याचे असे दोन जाहीरनामे करण्यात येतील.''

'भाजप सरकारची सध्याची नीती पाहता आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीतील त्यांचे अस्तित्व नगण्य मानतो. निवडणुकीपर्यंत भाजपविरोधी वातावरण तयार होत आहे. बोफोर्स खरेदीवर आरोप करणाऱ्या भाजपनेच विमानखरेदीत हस्तक्षेप करत "रिलायन्स'ला फायदा करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. स्वतः खात नाही म्हणणारे मोदी तिसऱ्याला खायला लावून आपल्या ताटात घेत आहेत,'' अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोण भेटले, याविषयी मला माहीत नाही. पण, रिपब्लिकन पक्षांची तिसरी आघाडी अस्तित्वात असती, तर भाजप सत्तेत आला नसता. कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष आहे का? याबाबत तपासणी करावी लागेल.
- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ

Web Title: bahujan samaj prakash ambedkar