बेळगाव : राजद्रोह गुन्‍ह्यात दोघांना जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bail
बेळगाव : राजद्रोह गुन्‍ह्यात दोघांना जामीन

बेळगाव : राजद्रोह गुन्‍ह्यात दोघांना जामीन

बेळगाव : राजद्रोह गुन्ह्यांतील दोघांना (treason case)आठवे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी मंगळवारी (ता.१२) सशर्त जामीन (bail)मंजूर केला आहे. अनगोळमधील संग्गोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणांत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पैकी एकाला नियमित व दुसऱ्याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. सूरज भरमा कंग्राळकर (वय २०, रा. कनकदास कॉलनी, आंबेडकरनगर), जोतिबा मनोहर भादूर्गे (वय ३१, रा. .कोनवाळ, आंबेडकरनगर) अशी त्यांची नावे आहेत.

हेही वाचा: Fact Check: घरगुती उपचारांमुळे कोरोना बरा होतो? सत्य आलं समोर

याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी शिवराज हिरय्या होळीमठ (वय २७) यांचे कनकदास गल्ली, आंबेडकर नगर, अनगोळला घर आहे. १८ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आले आणि त्याठिकाणी क्रांतीवीर श्री संग्गोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची चौघेजण मिळून मोडतोड करत असल्याचे दिसले. त्याला आक्षेप घेण्यासाठी त्यांनी आरडाओरड केला. यामुळे घटनास्थळी महांतेश कंबार, अरुण पाटील, सिध्दाप्पा होसमनी, नागेश नलतवाडी, विनायक होळकर आणि मल्लिकार्जुन वग्गण्णावर धावत पोचले. घटनास्थळाकडे धावत लोक येऊ लागल्याचे पाहून तेथून संशयितांनी पळ काढल्याची फिर्याद १८ डिसेंबरला टिळकवाडी पोलिस ठाण्यामध्ये दिली. त्यानुसार टिळकवाडी पोलिसांनी भादवि १२४ अ, १५३ अ, २९५, ४२७ सहकलम ३४ अन्वये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. २४ डिसेंबर रोजी पोलिसांनी संशयित सूरज भरमा कंग्राळकर (वय २०, रा. कनकदास कॉलनी, आंबेडकरनगर, अनगोळ) याला अटक केली. न्यायालयात हजर करून तेथून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली. दुसरा संशयित जोतिबा मनोहर भांदूर्गे (वय ३१, रा. कोनवाळ, आंबेडकर नगर, अनगोळ) फरारी होता.

हेही वाचा: कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

त्याने आठवे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला. सरकारी वकिलांनी या दाव्यात जामीनला आक्षेप घेतला. वरील संशयित काटा ग्राऊंड येथील खून व हाणामारी प्रकरणांत सहभागी आहेत. दोन्ही संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांना जामीन न देण्याबाबची मागणी केली होती. त्यानुसार आठवे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला आणि दोघांना सशर्त जामीन मंजूर केला. संशयित आरोपींतर्फे ॲड. प्रताप यादव यांनी काम पाहिले.

दोघे अल्पवयीन फरारी

अनगोळमधील पुतळा विटंबन प्रकरणांत चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून, त्यापैकी दोघांना जामीन मिळाला आहे. उर्वरित दोघे फरारी असून, ते अल्पवयीन आहे. त्यांचा तपास सुरु आहे.(Crime news)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top