मठाधिपती बाजीराव मामा चिपळूनमध्ये सापडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

कराड : मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती बाजीराव मामा यांना चिपळूनवरुन आज येथे आणण्यात आले. येथे आणल्यावर त्यांना येथील मठात नेण्यात आले. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. तेथुन प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

कराड कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती तीन दिवसापूर्वी येथून अचनाक बेपत्ता झाले होते. 
त्याबाबत त्यांचे चुलते शरद जगताप (रा. कोडोली) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. 
त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. त्यादरम्यान पोलिसांना ते चिपळूण येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्यांना चिपळूणमधील धन्वंतरी रूग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे आढळुन आले.

त्यानंतर चिपळूण पोलिसांनी येथील पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार येथील पोलिसांचे पथक त्यांना आणण्यासाठी रात्रीच रवाना झाले होते. त्यांना आज सकाळी येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांना येथील मठात नेण्यात आले. तेथुन प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Bajirao Mama found in chiplun