मठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

चिपळूण येथील धन्वंतरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती काल पोलिसांना मिळाली. त्याची खात्री चिपळूण पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्या रूग्णालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कऱ्हाड : येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

चिपळूण येथील धन्वंतरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती काल पोलिसांना मिळाली. त्याची खात्री चिपळूण पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्या रूग्णालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे. कऱ्हाड पोलिसांचे एक पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहे. मठाधिपती बाजीराव मामा सोमवारपासून बेपत्ता होते. त्या दिवशी दुपारी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून ते मठातून निघून गेले. त्यानंतर ते परतले नाहीत. त्याबाबत त्यांचे चुलते शरद जगताप यांनी शहर पोलीसात फिर्याद दिली आहे. घटनेने वारकरी सांप्रदायात खळबळ उडाली आहे. त्या बाबत  पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत. मठाधिपती बाजीराव मामा बँकेत जाऊन येतो, असे सांगून गेले होते. त्यामुळे  सहायक निरीक्षक जौंजाळ यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी कॉसमॉस बँकेला भेट देऊन तेथील सी सी टीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी मठाधिपती बँकेत आल्याचे दिसून आले. मात्र,  बँकेतून बाहेर पडल्यानंतर ते बेपत्ता झाले होते  असेही फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: bajiraomama karadkar found in Karad