बजरंग दलाचे साळुंखे, उरसाल यांचे राजीनामे

बजरंग दलाचे साळुंखे, उरसाल यांचे राजीनामे

कोल्हापूर - बजरंग दलाच्या जिल्हा संघटक व शहर संघटकपदाचा आपण राजीनामा देत असल्याची माहिती संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे व महेश उरसाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव २०१९ ची विधानसभा निवडणूक कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून लढविणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले. 

उरसाल म्हणाले, ‘‘संघटनेच्या धोरणानुसार हा निर्णय घेतला आहे. बजरंग दल ही राजकारणविरहित संघटना आहे. संघटनेची ध्येयधोरणे व आयामांना धक्का लागून संघटनेची अडचण होऊ नये म्हणूनच आपण या पदाचा राजीनामा देत आहोत. संघटनेतून बाहेर पडलो असलो तरी हिंदुत्वाचे काम हे आपल्याकडून सुरूच राहील.’’

यावेळी साळुंखे म्हणाले, ‘‘गेली ३५ वर्षे बजरंग दलाच्या जिल्हा संयोजक पदावर कार्यरत होतो. यावेळी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता, त्यानुसार मी रिंगणात उतरणार आहे. निवडणुकीत उमेदवारी घेताना प्राधान्य हे हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेल्या संघटनेला राहील; पण त्यापलीकडेही जाऊन आमचा विचार राहील. येत्या आठ-दहा दिवसांत सविस्तर भूमिका स्पष्ट केली जाईल.’’

हिंदुत्व न बघता शहराच्या व सामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे. कडवे हिंदुत्ववादी असलो, तरीही समाजात तेढ निर्माण होईल, असे कोणतेही गैरकृत्य आपण केले नसल्याचे साळुंखे, उरसाल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com