पंढरपुरात आज बकऱ्याची कुर्बानी नाही

अभय जोशी
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पंढरपूरः पुत्रदा एकादशीच्या दिवशीच आज (बुधवार) बकरी ईद आल्याने पंढरपूर मधील मुस्लीमबांधवांनी आज ऐवजी उद्या (गुरुवार) आणि परवा (शुक्रवार) बकऱ्याची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपुरात हिंदूच्या प्रमाणेच हजारो मुस्लीम देखील वर्षानुवर्षे रहात आहेत. येथील हिंदू मुस्लीमांमध्ये बंधुभावाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक सण व उत्सव एकत्र येऊन शांततेत साजरे केले जात असतात. या परंपरेला साजेसा निर्णय येथील मुस्लीम समाज बांधवांनी आज घेतला आहे. यापूर्वी देखील येथील मुस्लीम समाजबांधवांनी एकदशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्यास बकऱ्याची कुर्बानी एकादशी दिवशी न देण्याचा निर्णय घेतलेला होता.

या विषयी 'सकाळ'शी बोलताना मुस्लीम समाजाचे इलाही आतार म्हणाले, श्री विठ्ठलाच्या दरबारात आम्ही रहातो याचा आम्हाला अभिमान आहे. श्रावण महिन्यातील पवित्र अशा पुत्रदा एकादशीसाठी आज लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. बकरी ईद निमित्त तीन दिवसात कुर्बानी दिली तरी चालते. त्यामुळे आज बकरी इद असली तरी बकऱ्याची कुर्बानी देऊ नये असे आवाहन आम्ही केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व मुस्लीम बांधवांनी आज बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज जरी बकरी इद असली तरी उद्या (गुरुवारी) आणि परवा (शुक्रवारी) बकऱ्याची कुर्बानी दिली जाणार आहे.

दरम्यान, पावसामुळे सांगोला रस्त्यावरील इदगाह मैदाना ऐवजी शहरातील विविध मशीदींमध्ये मुस्लीम बांधवांनी बकरी ईद निमित्त नमाज पठण केले आणि एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: bakra eid there is no sacrifice today in Pandharpur

टॅग्स