लोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक असतो : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

माझी निवड ही काँग्रेसच्या कठीण काळात झालेली आहे. याची जाणीव तर आहेच पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक असतो. महागाई, पेट्रोल, रोजगार व इतर प्रश्नांवर सरकार हे अपयशी ठरलेले आहे आणि जनतेने हे सर्व पाहिलेले आहे.

शिर्डी : माझी निवड ही काँग्रेसच्या कठीण काळात झालेली आहे. याची जाणीव तर आहेच पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक असतो. महागाई, पेट्रोल, रोजगार व इतर प्रश्नांवर सरकार हे अपयशी ठरलेले आहे आणि जनतेने हे सर्व पाहीलेले आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे त्यांच्या धर्मपत्नीं स्रीमती कांचन ताई थोरात यांनी निवासस्थानी औंक्षण केले. या वेळी संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन करण्यासाठी राज्यभरातुन हितचिंतक येत आहेत.

थोरात म्हणाले, की माझी निवड ही काँग्रेसच्या कठीण काळात झालेली आहे. याची जाणीव तर आहेच पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक असतो. महागाई, पेट्रोल, रोजगार व इतर प्रश्नांवर सरकार हे अपयशी ठरलेले आहे आणि जनतेने हे सर्व पाहिलेले आहे. आम्ही आता या निवडणुकीत लोकशाही सरकार नक्कीच आणू. जे घडू नाही ते घडलेले आहे त्याचा ञास हा नक्कीच होईल. आता काँग्रेसमधे संधी युवकांसाठी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat talked about assembly election in Maharashtra