बेळगाव शहरातील कचरा उचल गुरूवारपासून बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

चऱ्याची उचल करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता गुरूवारपासून शहरातील कचऱ्याची उचल कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. बुधवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या आणखी गंभीर होण्याची भिती आहे

बेळगाव - बेळगाव शहरातील कचऱ्याची उचल न करण्याचा निर्णय सर्व दहा सफाई ठेकेदारानी घेतला आहे. त्यामुळे गुरूवारपासून (ता.1) बेळगाव शहरातील कचऱ्याची उचल होणार नाही. शहरात यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होणार आहे.

घंटागाडी योजनेची जबाबदारीही या ठेकेदारांकडेच आहे. त्यामुळे ही योजनाही गुरूवारपासून बंद राहणार आहे. शहरात दररोज 300 टन कचरा तयार होतो. शहरातील 58 पैकी 48 प्रभागातील कचऱ्याची उचल या दहा ठेकेदारांकडून केली जाते. 1 जूनपासून शहरातील कचऱ्याची उचल करणार नाही असा इशारा ठेकेदारानी दोन आठवड्यापूर्वी महापालिका प्रशासनाला दिला होती. त्याची लेखी माहिती आयुक्त शशीधर कुरेर याना दिली होती. पण पालिका प्रशासनाने या इशाऱ्याची दखल घेतलेली नाही. कचऱ्याची उचल करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता गुरूवारपासून शहरातील कचऱ्याची उचल कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. बुधवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या आणखी गंभीर होण्याची भिती आहे.

*सफाई ठेकेदार व महापालिका प्रशासनामध्ये गेल्या काही महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. ठेकेदारांची मुदत संपली आहे, पण पर्यायी ठेकेदारांची नियुक्ती न झाल्यामुळे महापालिकेकडून विद्यमान ठेकेदारानाच मुदतवाढ दिली जात आहे. पण सध्या ज्या दराने हे ठेकेदार शहर स्वच्छतेचे काम करत आहेत, त्या दराने यापुढे काम करणे शक्‍य नसल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यानी स्वच्छतेच्या कामातून मुक्त करण्याची मागणी त्यानी आयुक्तांकडे केली आहे. सध्याच्या दराने स्वच्छतेचे काम करणे शक्‍य नसल्याचे त्यानी स्पष्टपणे आयुक्ताना कळविले आहे. पण आयुक्तानी त्यांच्या या इशाऱ्याकडे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही. सफाई ठेकेदार 1 जूनपासून शहर स्वच्छतेचे काम करतील अशी अपेक्षा आयुक्त व आरोग्य विभागाला होती. पण बुधवारी सायंकाळी सर्व ठेकेदार एकत्र आले व त्यानी 1 जूनपासून स्वच्छतेचे काम व कचऱ्याची उचल न करण्याचा निर्णय घेतला. तशी माहिती त्यानी आरोग्य विभागालाही दिलेली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. 

Web Title: Balaugm News: Agitation