बाळ्याच्या खंडोबाची यात्रा बुधवारपासून

संतोष सिरसट
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- मार्गशीर्ष महिन्यातील सर्व रविवारी धार्मिक कार्यक्रम

- तिसऱ्या रविवारी शोभेचे दारूकाम

- यात्रेसाठी तीन राज्यातून लाखो भाविक

सोलापूर : बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून बुधवार (ता. 27) सुरु होत आहे. यादिवशी घटस्थापना होणार आहे. मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्टी व त्यापुढील तीन रविवारपर्यंत ही यात्रा चालणार आहे.

सांगलीत होता अजितदादांचा मोठा गट

यात्रेसाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. या कालावधीत पहाटे पाच वाजून 30 मिनिटांनी श्री ची काकड आरती, सकाळी आठ वाजता व रात्री सात वाजता महापूजा, अभिषेक करण्यात येतो. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे व जावळ काढण्याचे कार्यक्रम होतात. रात्री आठ वाजता श्री खंडोबा देवाची पालखी घोडा व विद्युत रोषणाईने सोलापूर येथून आलेले मानाच्या नंदीध्वजासह मिरवणूक काढली जाते. यावेळी धार्मिक लंगर तोडणे विधी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

साहेब बोलतात पण नेहमी खरंच

तिसऱ्या रविवारी रात्री ठीक आठ वाजता शोभेचे दारूकाम होते. मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जातो. महापालिकेकडून सिटी बस सेवा पुरविली जाते. पाण्याची सोय तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. याबरोबर समस्त पुजारी मंडळी यात्रा कालावधीत भाविकाच्या दर्शनाच्या व विविध विधींच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिवसभर सहभागी होऊन यात्रेची व्यवस्थितरीत्या नियोजन करतात.

एक जानेवारीला यात्रेची सांगता
एक जानेवारीला (पौष शुद्ध षष्ठी) महाप्रसाद करून पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे, गावडे इत्यादी मानकरी व भाविकांना प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता केली जाते. मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही यात्रा भाविकांचे आकर्षण ठरते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bale khandoba yatra starts from Wednesday