Sangli News : ५ वर्षं सुरळीत पाणीपुरवठा… पण अचानकच कमी दाब, कोरडे नळ; MIDC च्या बदललेल्या पाइपलाइनमुळे गावात हाहाकार
Pipeline Size Reduction Triggers : बामणोली ग्रामस्थांना गेल्या अनेक महिन्यांपासून जाणवत असलेल्या पाणीटंचाईमागचे खरे कारण अखेर समोर आले आहे. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून तीन इंच आकाराच्या जुन्या जलवाहिनीऐवजी नवी दोन इंचाची जलवाहिनी बसवण्यात आली.
कुपवाड : बामणोली (ता. मिरज) गावासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून कुपवाड एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीतून ग्रामस्थांना नळजोडणीसाठीच्या तीन इंच आकाराच्या वाहिनीतून सुरळीत नळपुरवठा होत होता.