कोल्हापूरः लक्ष्मीपुरी, शाहुपुरी येथे अवजड वाहनांना प्रवेश बंदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कोल्हापूर - लक्ष्मीपुरी धान्य व्यापारासह शाहूपुरीत येणाऱ्या मालवाहतूक व अवजड वाहनांना रविवार (ता. २३) पासून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालक, मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २१३ व्यापारी सदस्य आहेत. त्याचे गोडावून व व्यवसाय शहरात सुरू आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची लक्ष्मीपुरी व शाहूपुरी येथे संख्या मोठी असते. संबंधित व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने छत्रपती शाहू मार्केट यार्ड व टेंबलाईवाडी उपबाजार मार्केट यार्ड येथे जागा दिली आहे. परंतु, तेथे धान्य व्यापार केला जात नाही.

सध्या याठिकाणी आवश्‍यक असणाऱ्या मूलभूत सुविधा व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक उपाययोजनाही केल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांची मालवाहतूक करणारी वाहने शनिवार (ता.२२) पासून शहरात न आणता ती टेंबलाईवाडी उपबाजार समिती यार्डमध्ये न्यावीत. पण अशी वाहने जर शाहूपुरी, लक्ष्मीपुरीसह शहरात आली तर वाहनाच्या चालक, मालकांवर रविवार (ता. २३) पासून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.  

अवजड वाहनांमुळे कोंडीत भर
शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. शहराच्या मध्यवस्थीतील लक्ष्मीपुरीत धान्य बाजारपेठ आहे. येथे मालवाहतूक, अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात, अशी वाहने रहदारीच्या रस्त्यावर उभी असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते.

Web Title: The ban on vehicular traffic in Kolhapur City