नगरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

नगर शहरासह पारनेर, श्रीगोंदे, अकोले, कोपरगाव आदी तालुक्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. इतर तालुक्‍यातही बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

नगर : केडगाव परिसरात काल शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर यांच्यासह कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या खून प्रकरणी शिवसेनेने आज जिल्हा बंदचे आवाहन केले असून, त्यास संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 

नगर शहरासह पारनेर, श्रीगोंदे, अकोले, कोपरगाव आदी तालुक्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. इतर तालुक्‍यातही बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

शिवसेनेतर्फे आज शहरातून सकाळी दिल्ली दरवाजा येथून मोर्चा काढला आहे. खूनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात ठिकठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल झाले असून, ते आढावा घेत आहेत. तसेच गृराज्यमंत्री दीपक केसरकर देखील यासाठी नगरमध्ये येत आहेत.

Web Title: bandh in Nagar murder case