बंगळूरमधील आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

बंगळूर - बंगळूरमधील उदयनगर येथे घराला आग लागल्याने घरातील तिघांचा बुधवारी (ता. 27) सकाळी सहाच्या सुमारास होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये घरमालक मुरूगल (35), त्यांची पत्नी सोफिया (30) व त्यांची मुलगी फ्लोरा (6) यांचा समावेश आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी घरातून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे आढळून आले.

त्यांच्या शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून ही माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीची तीव्रता कमी करून घरात अडकलेल्यांना बाहेर काढेपर्यंत घरातील तिघांचाही होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी महादेवपूर पोलिस तपास करत आहेत.

Web Title: banglur kolhapur news three death in fire