समर्थ बॅंकेने पाठविले खातेदाराच्या घरी पैसे !

परशुराम कोकणे
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

डायलिसिस करण्यासाठी पैशांची तातडीने होती गरज 
सोलापूर - रुग्ण असलेल्या वृद्ध खातेदाराला डायलिसिस करण्यासाठी पैशांची तातडीने आवश्‍यकता असल्याने जुळे सोलापुरातील समर्थ बॅंकेने घरी पैसे पाठविले. बॅंकांमधील गर्दी पाहून टेन्शनमध्ये आलेल्या खातेदाराला बॅंकेने अशाप्रकारे मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. 

अंत्रोळीकर नगरात राहणाऱ्या डॉ. दिलीप बावचकर यांच्या पायाला दुखापत झाली आहे. शिवाय त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागते. दोन दिवसांपूर्वी ते पैसे काढण्यासाठी होटगी रोडवरील समर्थ बॅंकेच्या शाखेत गेले होते. बॅंकेच्या गर्दीत थांबणे त्यांना शक्‍य नसल्याने ते तसेच घरी परतले. त्यांनी जुळे सोलापूर शाखेचे व्यवस्थापक सुशील कुलकर्णी यांच्याशी परिचय असल्याने संपर्क साधला. डॉ. बावचकर यांची गरज लक्षात घेऊन श्री. कुलकर्णी यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर डॉ. बावचकर यांना त्यांच्या खात्यातील पैसे काढून कर्मचारी अक्षय देसाई यांच्यामार्फत घरी पाठविण्यात आले. पैसे मिळाल्यामुळे डॉ. बावचकर यांचे या आठवड्यातील डायलिसिस करता आले. 

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि खात्यावरील पैसे काढण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी होत आहे. आम्ही वृद्ध आणि महिलांना प्राधान्याने पैसे देत आहोत. डॉ. दिलीप बावचकर यांची गरज लक्षात घेऊन बॅंकेने त्यांना मदत केली आहे. 
- सुशील कुलकर्णी, व्यवस्थापक, समर्थ बॅंक, जुळे सोलापूर शाखा 

आजारपणामुळे मी बॅंकेतील रांगेत थांबू शकत नाही. बॅंकेने माझी गरज लक्षात घेऊन माझ्या खात्यावरील पैसे मला घरी पाठवून दिले. अशाप्रकारे इतरही बॅंकांनी खातेदारांची गरज लक्षात घेऊन मदत करायला हवी. 
- डॉ. दिलीप बावचकर, बॅंक खातेदार

Web Title: Bank account holders can send money back home!