कर्जवाटपात बॅंकांनी हात आखडला

तात्या लांडगे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

- निवडणुकीनंतर थकबाकीदारांत मोठी वाढ
- 18 जिल्ह्यांत 40 टक्‍केही कर्जवाटप नाही
- नव्या कर्जवाटपाबाबत बॅंकांचा सावध पवित्रा
- जिल्हा बॅंकांसह अन्य बॅंकांनी मांडायला सुरु केली थकबाकीची गणीते

सोलापूर : सरसकट कर्जमाफीच्या आशेने मागील वर्षभरात विशेषत: विधानसभा निवडणूक काळात थकबाकीदारांत 17 लाखांची भर पडल्याचे बॅंकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने यंदा खरीप व रब्बी हंगामात राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना एक लाख कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देऊनही आता कर्जवाटपात बॅंकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. सोलापूर, नाशिकसह राज्यातील 18 जिल्ह्यांत दोन्ही हंगामांत 40 टक्‍केही कर्जवाटप झाले नसल्याचे दिसून येते.

हेही वाचाच....

aschim-maharashtra/police-inspectors-inquiries-trap-243436">पोलिस निरीक्षक अडकले चौकशीच्या जाळ्यात

तत्कालीन युती सरकारने दीड लाखांची कर्जमाफी देऊनही राज्यातील 87 लाख शेतकऱ्यांकडे शेती कर्जाची थकबाकी असल्याचे चित्र आहे. दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, हमीभावाची प्रतीक्षा अशा कारणांमुळे थकबाकी वाढल्याचे बॅंकांनी सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीची घोषणा प्रचारसभांच्या माध्यमातून केली. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने आता बळिराजाला सात-बारा कोरा होईल, अशी आशा आहे. तत्पूर्वी, यावर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 74 हजार कोटींचे कर्जवाटप करावे, असे उद्दिष्ट राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिले. तर रब्बी हंगामात 15 लाख 92 हजार शेतकऱ्यांना 17 हजार कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर थकबाकीदार शेतकऱ्यांनी थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. यंदा खरीप हंगामात बॅंकांनी उद्दिष्टाच्या 49 टक्‍के तर रब्बी हंगामात 11 टक्‍के कर्जवाटप केल्याची माहिती राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिली. सोलापूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, वर्धा व नाशिक जिल्ह्यातील कर्जवाटप 40 टक्‍केही झाले नसल्याचे दिसून येते.

हेही वाचाच...पत्नीला धक्‍का...अन्‌ एका चिठ्ठीने उलगडले नवऱ्याचे पुर्वायुष्य

वसुलीचे नियोजन करूनही शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची सद्यःस्थितीत शेती कर्जाची एक हजार 287 कोटींची येणेबाकी आहे. दीड लाखांची कर्जमाफी होऊनही सद्यःस्थितीत बॅंकेची 874 कोटींची थकबाकी आहे. डिसेंबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत वसुलीचे नियोजन करूनही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर शेतकरी कर्ज भरायला बॅंकेत फिरकत नसल्याचे चित्र आहे.
- शैलेश कोथमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर

हेही वाचाच...'हा' भाजप नेता दाखल करणार एक कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

राज्याची स्थिती
खरीप-रब्बी कर्जवाटपाचे उद्दिष्ट
59.76 लाख
कर्जवाटप शेतकरी
22.63 लाख
निवडणुकीनंतरचे थकबाकीदार
17.48 लाख
सद्यःस्थितीतील एकूण थकबाकीदार
86.91 लाख

Remarks :

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks clasp their hands in debt