Vidhan Sabha 2019 : प्रभाकर देशमुखांनाच आमदार करण्याची बनपूरी परिसरातील ग्रामस्थांची घेतली शपथ

Vidhan Sabha 2019 : प्रभाकर देशमुखांनाच आमदार करण्याची बनपूरी परिसरातील ग्रामस्थांची घेतली शपथ

वडूज : खटाव माण तालुक्यात निर्माण झालेले दहशतीचे वातावरण, कलंकित व्यक्तींमुळे तालुक्याची होत असलेली वाताहात रोखण्यासाठी, माझ्या कुटुंबियांच्या उज्ज्वल भविष्यासह माझ्या गावच्या, परिसराच्या व खटाव-माण तालुक्यांच्या विकासासाठी अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुखसाहेब यांनाच आमदार करण्याची ग्वाही देत आहे, अशी शपथ बनपूरी (ता.खटाव) परिसरातील ग्रामस्थांनी घेतली.

देशमुख यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त कातरखटाव गणातील विविध गावांत आज नागरिकांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर बनपूरी येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांनी हात उंचावून देशमुख यांचे समर्थन करीत ही ग्वाही दिली.

यावेळी अनुराधा देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुनराव खाडे, नियोजन मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, मोहनराव देशमुख, माजी सभापती संदिप मांडवे, माजी उपसभापती नाना पुजारी, प्रा. एस. पी. देशमुख,  प्रा. कविता म्हेत्रे, श्रीरंग देवकर, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे ऍड. प्रमोद देवकर, सत्यवान कांबळे, हणमंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या दहा वर्षांत खटाव माण तालुक्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विकासकामांच्या पोकळ गप्पा आणि पाणी प्रश्नच आम्ही प्रत्येक निवडणूकीत ऐकत आहोत. या तालुक्यांची झालेली वाताहात, निर्माण झालेले दहशतीचे वातावरण दूर करण्यासाठी आम्हाला प्रभाकर देशमुख साहेबांच्या माध्यमातून आशेचा आणि विकासाचा किरण दिसला आहे. त्यामुळे या निवडणूकीत अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख साहेबांची पाठराखण करणार असल्याची ग्वाही बनपूरी परिसरातील ग्रामस्थांनी यावेळी बोलताना दिली.

देशमुख म्हणाल्या, माण खटाव तालुक्यांची विकासापासून झालेली अवहेलना दूर करण्यासाठी दोन्ही तालुक्यांतील जनता एकवटली आहे. विधानसभेची निवडणूक हे टीमवर्क आहे. आमचं ठरलंय मधील प्रत्येक मान्यवरच हे या निवडणूकीतील उमेदवार आहेत. त्यामुळे सर्वजण एकदिलाने काम करीत आहेत.

तालुक्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणे, औद्योगिकरणाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागांतील मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे, माता भगिनींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कुटूंबाच्या प्रगतीस चालना देण्यासाठी प्रोत्साहन देणे असे सकारात्मक व विकासात्मक विचार घेऊन या निवडणूकीत प्रभाकर देशमुख उतरले आहेत. त्यांना सर्वांनी साथ करावी.

सभापती मांडवे म्हणाले, गोरे बंधू हटाव.. माण खटाव बचाव असा नारा दोन्ही तालुक्यातील गावोगावची जनता देऊ लागली आहे. विरोधकांच्या दहशत व गुंडगिरीला जनता कंटाळली आहे त्यांमुळे विरोधकांना हद्दपार करण्याची तयारी आमचं ठरलंयच्या टिमने केली आहे. शिवाय दोन्ही तालुक्यांतील जनतेने निवडणूक  हातात घेऊन मोठा उठाव केला आहे. देशमुख साहेबांचा वारु आता कोणत्याही परिस्थितीत आपण रोखू शकत नसल्याची खात्री विरोधकांना झाली आहे त्यामुळे देशमुख साहेबांना विक्रमी मताधिक्क्यांनी निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.

नाना पुजारी म्हणाले, कातरखटाव गणातील गावे वाड्या वस्त्या देशमुख साहेबांना चांगले मताधिक्य मिळवून देण्यासाठी एकवटल्या आहेत. या तालुक्यातील सर्व नेतेमंडळी, जनता एक झाल्याने विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता देशमुख साहेबांना चांगल्या मतांनी विजयी करावे. यावेळी कविता म्हेत्रे आदींची भाषणे झाली. सागर देवकर यांनी प्रास्ताविक केले. पांडूरंग देवकर यांनी आभार मानले.

यावेळी गोपीनाथ शिंदे, बापूराव देवकर, शशिकांत नलवडे, तुकाराम शिंदे, दत्तात्रय नलवडे, राजेंद्र देशमुख, गजानन फडतरे, आदी मान्यवर तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुराधा देशमुख यांनी साधला महिलांशी संवाद
प्रचारादरम्यान गावातील रस्त्यानजिक काही महिला काम करीत बसल्या होत्या. त्यावेळी अनुराधा देशमुख यांनी त्या महिलांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. महिलांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत आपल्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी या भागांत चांगले शिक्षण मिळावे, रोजगार उपलब्ध व्हावे, शेतीला पाणी मिळावे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे अशी साहेबांची मनापासून तळमळ आहे. त्यामुळे साहेबांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com