साहेब लक्ष असू द्या...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

कोल्हापूर - साहेब नमस्कार, लक्ष ठेवा, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे... असा मतदान केंद्रापर्यंत मतदार जाईपर्यंत उमेदवारांकडून प्रचार सुरू होता. मतदान केंद्राबाहेर सकाळपासून अखेरच्या क्षणापर्यंत वकिलांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. तीन पॅनेलमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी ७३.३५ टक्के मतदान झाले. 

जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांसह १५ जागांसाठी आज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान झाले. एकूण २४०६ मतदारांपैकी १७६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक रिंगणात तीन पॅनेलसह तब्बल ४२ उमेदवार रिंगणात होते. शहरासह चंदगड, राधानगरी, भुदरगड, पन्हाळासह जिल्ह्यातील वकील मतदानासाठी सकाळपासून उपस्थित होते. उमेदवार व त्यांचे प्रचारक मतदारांचे स्वागत करत होते. मतदाराला ‘साहेब लक्ष असू द्या...’ असे वारंवार सांगण्यात येत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी सहानंतर मतमोजणीस सुरुवात झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bar association election