बेळगाव : बार असोसिएशन निवडणूक; उमेदवारांकडून प्रचाराचा नारळ फुटला | Bar Association Election update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Bar association

बेळगाव : बार असोसिएशन निवडणूक; उमेदवारांकडून प्रचाराचा नारळ फुटला

बेळगाव : बार असोसिएशनसाठी (Bar Association) शनिवार (ता. २०) मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया (voting) पार पडणार आहे. त्यामुळे रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवाराकडून (candidates) जोरदार जाहीर प्रचाराला (Election campaign) सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालय आवारात इलेक्शन फिव्हर (election) पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा: खारघर मध्ये ११ वर्षीय मुलीवर चुलत्या कडून लैंगिक अत्याचार

अध्यक्षपदासाठी ॲड.दिनेश पाटील आणि ॲड. प्रभु यतनट्टी यांच्यात लढत होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. व्ही. आर. कामते,ॲड. अमित कोकितकर,ॲड. बसवराज मुगळी,ॲड. लक्ष्मण पाटील,ॲड. विनोद पाटील,ॲड. सचिन शीवण्णावर यांच्यात लढत होणार आहे. जनरल सेक्रेटरी पदासाठी ॲड. सतीश बिरादार,ॲड. शिवलिंगअप्पा बुदिहाळ,ॲड. वाय. के दिवटे,ॲड. रवींद्र गुंजाळे,ॲड. सदाक्षरी हिरेमठ,ॲड. गिरीश पाटील यांच्या लढत होणार आहे. सहसचिव पदासाठी ॲड. बंटी कपाई,ॲड. सुधीर कुलकर्णी,ॲड. निंगनगौडा पाटील,ॲड. विश्वनाथ सुलतानपुरी यांच्यात लढत होणार आहे.

तर सदस्य पदासाठी ॲड. मुरलीधर भस्मे, ॲड. आय. वाय. बयाल, ॲड. आनंद घोरपडे,ॲड. येशूनाथ गुट्टेण्णावर,ॲड. चंद्रशेखर हिरेमठ,ॲड. रमेश मोदगेकर,ॲड. सुरेश नागनूरी, ॲड.आदर्श पाटील, ॲड.महांतेश पाटील,ॲड. राकेश पाटील,ॲड. पि. के पवार,ॲड. अभिषेक उदोशी,ॲड. विठ्ठल उपरी यांच्यात लढत होणार आहे. तर महिला प्रतिनिधी जागेसाठी ॲड. शकुंतला कांबळे आणि ॲड. पूजा पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. संजय तुबची हे काम पहात आहेत. बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवाराकडून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या जात आहेत. तसेच आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी त्यांच्या समर्थकांकडून देखील जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. एकंदरीत न्यायालय आवारात इलेक्शन फिव्हर पाहावयास मिळत आहे. सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा सुरू असून २० रोजी संभाव्य उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे वकील वर्गाच्या नजरा या निवडणुकीकडे लागून राहिल्या आहेत.

loading image
go to top