खारघर मध्ये ११ वर्षीय मुलीवर चुलत्या कडून लैंगिक अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

खारघर मध्ये ११ वर्षीय मुलीवर चुलत्या कडून लैंगिक अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारघर : खारघरमध्ये एका ११ वर्षीय मुलीवर चुलत्याने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. फरीद खलील शेख असे आरोपीचे नाव आहे. फरीद हा तडीपार गुन्हेगार आहे. या कालावधीत त्याने हा गुन्हा केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खारघर पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा: 'पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार नाही', आणखी एका स्पर्धकाचा निर्णय

ओवे परिसरातील एका गावात ही घटना घडली. एकाच इमारतीत पीडितेचे कुटुंब आणि तिचा चुलता वास्तव्यास आहे. पीडितेचे वडील हे एका गुन्ह्यात दोषी सिद्ध झाल्याने शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, पीडितेची आई कामात असल्याचे पाहून फरीदने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी खारघर पोलिस तपास करीत आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेखवर काही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला तडीपार घोषित करण्यात आले होते.

loading image
go to top