बारसकर यांची प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याने युवकांमध्ये नवचैतन्य

राजकुमार शहा 
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मोहोळ चे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याने मोहोळ तालुक्यातील विषेशतः युवकात नव चैतन्य निर्माण झाले आहे येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अत्यंत चाणाक्षपणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्यकारीणी निवडी केल्या आहेत बारसकर यांच्या निवडीचा फायदा तालुक्यातील राष्ट्रवादीला होणार आहे.
 

मोहोळ- मोहोळ चे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याने मोहोळ तालुक्यातील विषेशतः युवकात नव चैतन्य निर्माण झाले आहे येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अत्यंत चाणाक्षपणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्यकारीणी निवडी केल्या आहेत बारसकर यांच्या निवडीचा फायदा तालुक्यातील राष्ट्रवादीला होणार आहे.

राष्ट्रवादीने बारसकर यांना ज्या ज्या वेळी विविध कामांची वा कार्यक्रमाची संधी दिली त्या त्या वेळी त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली त्यात मोहोळ येथे आलेली संघर्ष यात्रा नागपूर येथे निघालेल्या पायी यात्रेत ही त्यांनी सहभाग नोंदविला होता सत्तेवर कोणीही असो त्यांच्या कडुन कौशल्याने निधी आणुन शहराचा विकास कसा करता येईल याकडे त्यांचे विषेश लक्ष असते देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खा. वाजीद मेमन यांच्याकडुन एक कोटी रुपयाचा विकास निधी आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बारसकर यांचा थेट संपर्क आहे.

या पुर्वी राष्ट्रवादीत चांगले काम केले आहेच पण नवीन जबाबदारी मुळे युवक संघटन चांगल्या प्रकारे करून राष्ट्रवादीची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यiत पोचविणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीत सर्वसामान्याला कशी संधी देता येईल यासाठी आपला प्रयत्न असल्याचे बारसकर यांनी सांगीतले आगामी विधानसभा व लोकसभा डोळयासमोर ठेवुन अत्यंत हुषारीने या निवडी केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे

Web Title: Baraskar was elected as the NCPs Secretary of State