जिल्ह्यात बार्शी रुग्ण अन्‌ मृत्यूमध्ये अव्वल ! 'या' गावांमध्ये वाढले मृत्यू; आज नवे 152 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
Monday, 27 July 2020

 

ठळक बाबी... 

 • जिल्ह्यातील एकूण 23 हजार 69 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार 972 झाली 
 • आतापर्यंत जिल्ह्यातील 57 पुरुष आणि 25 महिलांचा कोरोनाने घेतला बळी 
 • एक हजार 352 पैकी 152 पॉझिटिव्ह; सात जणांचा झाला मृत्यू 
 • आतापर्यंत एक हजार 605 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 285 रुग्णांवर उपचार सुरु 

सोलापूर : शहराच्या तुलनेने आता जिल्ह्यातही कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. रविवारी एक हजार 352 व्यक्‍तींची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 152 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने आता जिल्ह्यातील नागरिक चिंतेत आहेत. 

 

जिल्ह्यात अक्‍कलकोटमधील बेडर गल्ली, मस्के गल्ली, वेताळ चौक, सुलेरजवळगे येथे प्रत्येकी एक, करमाळ्यातील आळसुंदे, शेलगाव (क) येथे अनुक्रमे एक व दोन रुग्ण सापडले आहेत. माढ्यातील कुर्डूवाडीत तीन, मुंगशीत एक, पडसाळीत दोन, रांझणीत चार, रिधोऱ्यात चार, तांदुळवाडी, उपळाई खु. येथे प्रत्येकी एक, माळशिरसमधील अकलुज व बोरगावमध्ये 
प्रत्येकी तीन, माळीनगर, श्रीपुर, उघडेवाडी, सिध्दार्थ नगर, विझोरीत प्रत्येकी एक, तर संग्राम नगर व वेळापुरात दोन, यशवंत नगरात सहा रुग्ण आढळले आहेत. मंगळवेढ्यातील बावची, फॅबटेक कारखाना कॉलनी, कात्राळ येथे प्रत्येकी तीन, मुंडवीत चार, मोहोळमधील आष्टे, खंडाळी, कोरवली, लांबोटी, नरखेड येथे प्रत्येकी एक, यावलीत दोन रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापुरातील पडसाळीत आठ, सांगोल्यातील वासूद रोडवर, कोळा येथे प्रत्येकी एक, दक्षिण सोलापुरातील हत्तुर, होटगी येथे प्रत्येकी एक, कंदलगावात 15, मंद्रूपमध्ये चार रुग्ण सापडले. तसेच बार्शीतील अलिपूर रोडवर दोन, मनगिरे मळा, सिध्दार्थ नगर, सुभाष नगर, धोत्रे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. पंढरपुरातील अनिल चौकात दोन, भोसले चौक, गांधी रोड, खवा बाजार, कुंभार गल्ली, महाद्वार, रेल्वे कॉलनी, रोहिदास चौक, सांगोला रोड, विप्रदत्त घाट, करोळे, नेपतगाव येथे प्रत्येकी एक, घोंगडे गल्ली, गोविंदपुरात प्रत्येकी सात, हनुमान मैदान, जुनी पेठेत प्रत्येकी तीन, इसबावीत चार, सणगर गल्लीत चार, संतपेठेत दोन, तानाजी चौकात सात, विजापूर गल्लीत चार रुग्ण आढळले आहेत. 

ठळक बाबी... 

 • जिल्ह्यातील एकूण 23 हजार 69 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार 972 झाली 
 • आतापर्यंत जिल्ह्यातील 57 पुरुष आणि 25 महिलांचा कोरोनाने घेतला बळी 
 • एक हजार 352 पैकी 152 पॉझिटिव्ह; सात जणांचा झाला मृत्यू 
 • आतापर्यंत एक हजार 605 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 285 रुग्णांवर उपचार सुरु 
 •  
 • 'या' गावातील कोरोनाबाधितांचा मृत्यू 
  पंढरपुरातील आंबेडकर नगरातील 65 वर्षीय पुरुषाचा तर घोंगडे गल्लीतील 75 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मोहोळमधील अण्णाभाऊ साठे नगरातील 71 वर्षीय पुरुषाचा, बार्शीतील सर्जापूर येथील 45 वर्षीय महिलेचा, तेल गिरणी चौकातील 36 वर्षीय महिलेचा, नाईकवाडी प्लॉटमधील 75 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. अकलूज येथील दत्त चौक परिसरातील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barshi in the corona patient tops district Today 152 new positives and seven death