जनतेच्या लढ्यात, नेत्यांची साथ 

रूपेश कदम 
शनिवार, 5 मे 2018

मलवडी - माणदेशी जनतेच्या दुष्काळाशी सुरुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळत आहे. ग्रामस्थांचे मनोबल वाढविण्यासाठी गावोगावी श्रमदान करतानाच आर्थिक वा यांत्रिकी मदत करण्याचा नेतेमंडळींनी धडाका लावला आहे. 

मलवडी - माणदेशी जनतेच्या दुष्काळाशी सुरुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळत आहे. ग्रामस्थांचे मनोबल वाढविण्यासाठी गावोगावी श्रमदान करतानाच आर्थिक वा यांत्रिकी मदत करण्याचा नेतेमंडळींनी धडाका लावला आहे. 

आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख व सातारा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी यानिमित्ताने माण मतदारसंघ पिंजून काढला आहे. श्री. गोरे हे दररोज दोन ते तीन गावांत श्रमदान करत आहेत. हातात टिकाव आणि फावडे घेऊन गावकऱ्यांसह ते जलसंधारणाच्या कामात मदत करत आहेत. श्रमदान केल्यावर ते श्रमदात्यांना संबोधित करून त्यांचा उत्साह वाढवत आहेत. मशिनची मदत देण्याचा प्रयत्नही करत आहेत. श्री. घार्गे यांनीही आपल्या सहकार्यांसोबत गावोगावी भेटी सुरू केल्या आहेत. माणमधील कळसकरवाडी व गाडेवाडी ही दोन गावे त्यांनी दत्तक घेतली असून, तिथे ते मदत करणार आहेत. श्री. देशमुख व त्यांची पत्नी अनुराधा देशमुख हे दोघे जवळपास संपूर्ण माण व खटाव तालुक्‍यांतील श्रमदान सुरू असलेल्या गावात पोचले आहेत. ग्रामस्थांना मार्गदर्शनही करत आहेत. तसेच खासदार शरद पवार, कंपनी सामाजिक दायित्व (C.S.R.), ड्रीम सोशल फाउंडेशन व माणदेशी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आर्थिक व मशिनची मदत करत आहेत. श्री. देसाई हे स्वतः तसेच शासनाच्या माध्यमातून गावांना मदत देत आहेत. अनेक गावांना त्यांनी मशिन, डिझेल वा आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. नेतेमंडळींच्या या मदतीमुळे तसेच साथीमुळे श्रमदात्यांचा उत्साह वाढला असून ते अजून जोमाने जलसंधारणाची कामे करत आहेत. 

""माण-खटावमध्ये हजारो हात जलक्रांती करण्यासाठी सरसावले आहेत. प्रत्येकजण काही ना काही योगदान देत आहे. माझ्या माणदेशी जनतेला साथ देण्यासाठी मी सदैव तयार आहे.'' 
-जयकुमार गोरे, आमदार 

""माण-खटावमधील श्रमदानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या चळवळीत माझा सक्रिय सहभाग असून, ग्रामस्थांना मदत करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही.'' 
प्रभाकर घार्गे, माजी आमदार 

""जलसिंचन, जलसंवर्धनाचे महत्त्व वेळीच ओळखून स्वयंस्फूर्तीने पुढच्या पिढीसाठी पाण्याचे संवर्धन करण्याचे जे काम सुरू आहे, त्याला मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' 
-प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त 

""आपले गाव पाणीदार व्हावे म्हणून ग्रामस्थांचे जे प्रयत्न सुरुरू आहेत, त्यात आपला मदतीचा खारीचा वाटा असावा, हीच आमची धारणा आहे.'' 
-अनिल देसाई, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप, सातारा जिल्हा 

(क्रमशः) 

Web Title: battle against the indigenous people drought is getting big success