सावधान ! वाहनधारकांना होणार जबर दंड...

 Be Careful Vehicles Will Be Punished  Kolhapur Marathi News
Be Careful Vehicles Will Be Punished Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहर वाहतूक शाखेने २०१९ मध्ये तब्बल २३ हजार वाहनचालकांवर कारवाई करीत ५१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहर वाहतूक शाखेच्या इतिहासातील हा सर्वाधिक दंड असल्याचे मानले जाते. दरम्यान, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, याच्या माध्यमातून सहा महिन्यांत १६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नागरी वस्तीत सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून इचलकरंजी शहराचा समावेश होतो. प्रतिचौरस किलोमीटरमध्ये तब्बल दहा हजार नागरिक या ठिकाणी राहतात. २८ चौरस किलोमीटरच्या परिसरात साडेपाचशे किमीचे रस्ते आहेत. अशा या शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी यावर्षी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली. त्याबद्दल वेगवेगळ्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १४ हजार २४४ कारवाया यावर्षी करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - पर्यटनस्थळांवर अभ्यागत कराबाबत का आहे उदासीनता ?

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यां कारवाई
सेफ्टी अंतर्गत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेराचा उपयोग वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाला आहे. या माध्यमातून सहा महिन्यात ७३०० हून अधिक जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख ७७ हजार रुपये दंड वसूल केला आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवरही यावर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. तब्बल २३२ जणांवर कारवाई करीत चार लाख २४ हजार ५०० रुपये यावर्षी वसूल करण्यात आला आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम जवळपास दुप्पट आहे.

वाहनचालकांत जागृती वाढली
शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी यावर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहनचालकांत जागृती वाढली. त्यामुळे दंडात्मक भीतीमुळे नागरिक वाहन चालविताना गांभीर्याने पाहतील, असे वाटते.
-नंदकुमार मोरे, शहर वाहतूक शाखा, सहायक पोलिस निरीक्षक

  कारवाई तपशील                             एकूण      रक्कम
सिट बेल्ट न लावणे                            २९१३      ९२ ,८००
पोलिसांचा इशारा न मानणे                   १९५२      ३३,०००
दारू पिऊन वाहन चालविणे                   २३२     ४,२४,५००
वाहन चालविताना लायसन न बाळगणे    ५१०५     ५,२१,८००
नो पार्किंग                                            ३०६२       ४,१२,०००
परवाना नसताना वाहन चालविणे              ५६३     २,००,६००
प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे             १७४९     १,३७,८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com