गुढे-पाचगणी पठारावर खुललं निसर्गाचं लावण्य

निसर्गाची मुक्त उधळण; पर्यटक घेताहेत मनमुराद आनंद
sangli
sanglisakal
Updated on

कोकरूड : श्रावण मासी हर्ष माणसी, हिरवळ दाटे चोहीकडे; क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, या काव्यपंक्तीचा प्रत्यय देणारे नयनरम्य चित्र निसर्गसौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिराळा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर संबोधळ्या जाणाऱ्या गुढे-पाचगणी पठारावर दिसत आहे.

जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस नैसर्गिक देणगी लाभलेले हे पठार उंच ठिकाणांपैकी एक आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन क्षेत्रात सुमारे दहा हेक्टर क्षेत्रफळात विस्तारले आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गुढे-पाचगणी पठारावर रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे हिरवीगर्द वनराई बहरली आहे. डोंगर रांगातून पसरलेले विस्तीर्ण पठार, हिरवाईने नटलेले डोंगर, कड्या-कपारीतून झुळझुळ वाहणारे छोटे-मोठे धबधबे, पायऱ्या-पायऱ्यांची भात शेती खुणावत आहेत.

श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळात सृष्टीचं लावण्य पाहणाऱ्या प्रत्येकाला परिसर भुरळ घालत आहे. नजर फिरेल तिकडे हिरवाईने नटलेली विलोभनीय दृश्यं पाहताना मन अचंबित होते. हिरव्यागार सृष्टीने पठारावरील सौंदर्य आणखी खुललेले आहे. गुढे पाचगणी पठारावर जाताना रांजणवाडी, सावंतवाडी, भाष्टेवाडी, येसलेवाडी येथील घाटातून प्रवास करताना असलेली नागमोडी वळणे व या घाटाला लाभलेले निसर्ग संपन्न वैभव पावसाळ्यात दिसणारी हिरवीगार दृश्यं सर्वांनाच भुरळ पाडतात.

sangli
कुटुंबाची ओळख आता एका क्लिकवर; घरांवर बसणार 'डिजिटल चिप'

निसर्गाचा हा अद्भुत नजराणा पाहताना आजूबाजूचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करीत आहे. भटकंती करायला येणाऱ्यांना एक वेगळा आनंद मिळत आहे. झोंबणारा गार-गार वारा आल्हाददायक आहे. अंगावर रोमांच उभे करतो. गरगर फिरणाऱ्या गगनचुंबी पवनचक्क्या लक्ष वेधून घेतात. कास पठाराच्या धरतीवर या ठिकाणी औषधी वनस्पतीसह वेगवेगळ्या अनेक रंगीबेरंगी रान फुलांचा बहर पाहायला मिळतो. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल. शासन स्तरावर याची दखल घेऊन विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

sangli
'आग्रा-राजगड-पारगड' शिवज्योतीचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

असे जाता येईल

  • पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग-कराड-पाचवड फाटा-येनपे-मेणी फाटामार्गे, रांजणवाडी-सावंतवाडी-गुढे अंदाजे अंतर ८० कि. मी.

  • सांगली-आष्टा-पेठनाका-शिराळा-कोकरुड-शेडगेवाडी-चरण-आरळा-येसलेवाडी- अंदाजे अंतर १०० कि.मी.

  • कोल्हापूर-वाघबीळ-बांबवडे-भेयेडसगाव-कोकरुड-शेडगेवाडी-चरण-आरळा-येसलेवाडी अंदाजे अंतर १०५ कि.मी.

-बाजीराव घोडे-पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com