कुटुंबाची ओळख आता एका क्लिकवर; घरांवर बसणार 'डिजिटल चिप'

कुटुंबाची ओळख आता एका क्लिकवर; घरांवर बसणार 'डिजिटल चिप'

Summary

शासनाकडून होणारे विविध सर्व्हे किंवा नगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवा यासाठी हा डिजीटल चिप प्रत्येक मालमत्ताधारकाच्या घरी बसविण्यात येणार आहे.

गडहिंग्लज : शासनाकडून येणारा कोणताही सर्व्हे असो अगर नगरपालिका, नगरपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, यात पादर्शकता व वेळेची बचत होण्यासाठी आता जिल्ह्यातील पालिकांच्या हद्दीतील प्रत्येक कुटुंबाची (मालमत्ताधारक) ओळख एका क्लिकवर पालिका कर्मचाऱ्‍यांना कळणार आहे. घराघरात ‘रेडीओ तरंग ओळखपत्र’ (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन डीव्हाईस) हे ‘डिजीटल चिप’ बसविण्यात येणार असून दोन महिन्यात हा उपक्रम पुर्णत्वाला जाणार आहे.

काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत याबाबतचे निर्देश दिले आहेत. या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून मालमत्ता धारकांचा डेटा बेस तयार होणार आहे. शासनाच्या विविध मोहिमेतंर्गत आरोग्य, दिव्यांग संदर्भात विविध सर्व्हेक्षण होतात. त्यासाठी घरात जाऊन माहिती घ्यावी लागते. त्यातच सर्व्हेक्षण पथकातील कर्मचारी मागे केंव्हा तरी घेतलेली माहिती ‘मागील पानावरुन पुढे’ या धर्तीवर अपलोड करतात. हे पथक घरोघरी जाते की नाही हे तपासणेही अवघड असते. यामुळे संकलित माहितीतून निष्कर्ष काढणे कठीण जाते. परिणामी नागरिकांना बऱ्याच सेवांपासून वंचितही राहावे लागते.

कुटुंबाची ओळख आता एका क्लिकवर; घरांवर बसणार 'डिजिटल चिप'
'गावांना विश्‍वासात घेतले, तरच हद्दवाढ करता येईल'

शासनाकडून होणारे विविध सर्व्हे किंवा नगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवा यासाठी हा डिजीटल चिप प्रत्येक मालमत्ताधारकाच्या घरी बसविण्यात येणार आहे. प्रत्येक चिपमध्ये संबंधित कुटुंबाची इत्थंभूत माहिती डाटा एंट्री यात केली जाणार आहे. शहरात कोणत्या भागात कोणत्या सेवेची गरज आहे, हेसुद्धा चिपद्वारे कळणार आहे. याच माहितीच्या आधारे मालमत्तांची गणनाही होऊ शकते. सर्व्हेक्षणचे कर्मचारी कोणत्या घरात सर्व्हेक्षणासाठी गेलेले नाहीत हे लक्षात येणार आहे. सध्या शहरांमधून होणारे कचरा संकलन व विलगीकरण या प्रक्रियेवर आणि घंटागाडीद्वारे कचऱ्याचे संकलन सुरळीत होते की नाही, यावरही नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. दरम्यान, याची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने गडहिंग्लज नगरपालिकेने आजच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी दिली असून रेडिओ तरंग ओळखपत्र व डिव्हाईस खरेदीसाठी २४ लाखाच्या खर्चास मान्यताही दिली आहे.

काय आहे ‘डिजीटल चिप'चे काम

मालमत्ताधारकांच्या घरात डिजीटल चिप बसविण्यात येईल. त्याचे डिव्हाईस पालिका कर्मचाऱ्यांकडे असेल. कोणत्याही सर्व्हेसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याने हे चिप डीव्हाईसद्वारे स्कॅन करतील. त्यातील कुटुंबाची माहिती ऑनलाईन अपलोड करतील. कचरा संकलनासाठी जाणारी घंटागाडी प्रत्येक घरातून कचरा गोळा करताना चिप स्कॅन करुन संबंधित कुटूंबाने कचरा दिला आहे की नाही, याची माहिती अपलोड करेल.

कुटुंबाची ओळख आता एका क्लिकवर; घरांवर बसणार 'डिजिटल चिप'
कोल्हापूर - टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांचे निधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com