वयामुळे गप्प बसतोय, अन्यथा माझ्यासारखा वाईट नाही : उदयनराजे भोसले

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 18 मे 2018

सातारा : कोणी आम्हाला टवाळकी म्हणू दे अन् काय...मी त्याला भीक घालत नाही. मी दडूनही बसत नाही. लोक बदललेत. माझ्यात काय बदल झाला आहे का? नाही ना. वयामुळे गप्प बसतोय. नाही तर माझ्यासारखा वाईट नाही. किती सहन करायचे. शेवटी प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट असतो. मी माझ्या स्वतःच्या हिंमतीवर लढतो, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. 

सातारा : कोणी आम्हाला टवाळकी म्हणू दे अन् काय...मी त्याला भीक घालत नाही. मी दडूनही बसत नाही. लोक बदललेत. माझ्यात काय बदल झाला आहे का? नाही ना. वयामुळे गप्प बसतोय. नाही तर माझ्यासारखा वाईट नाही. किती सहन करायचे. शेवटी प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट असतो. मी माझ्या स्वतःच्या हिंमतीवर लढतो, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. 

राजधानी महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार भोसले बोलत होते. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. राष्ट्रवादीचे नेते म्हणतात, त्यांनी बोलावे तसे करुन दाखवावे या प्रश्‍नावर खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता ते म्हणाले, "ज्यांनी विचारले आहे ना त्यांच्यात जर दम असेल ना त्यांनी समोरासमोर येऊन विचारा ना. नाडी कुणाची कोण खोलतोय....म्हणून तर पँट घातलीय...बेल्ट पण घातलाय...नाडी कोण घालतो बघा....अन कॉलर पण कोणाचीय...वयामुळे गप्प बसतोय. नाही तर माझ्यासारखा वाईट नाही. किती सहन करायचे.

शेवटी प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्‍ट असतो. आम्ही करतोय. तुम्ही करा ना. तुमचे हात बांधलेत. नाही. का केले नाही. कर्तृत्व नाही असेही म्हणता येणार नाही. इच्छाशक्ती नाही हेच त्याचे कारण.'' 

आम्हाला काय करायचे ते आम्ही करतो. नौटंकी करतो, करतो, लावणीचा कार्यक्रम करणार, हो करणार, त्याला मात्र येणार. कोणी नाही आले तर तर तुम्ही लोक मात्र येणार असे उदयनराजे पत्रकारांना उद्देशून म्हणाले. रयत शिक्षण संस्थेत राजघराण्यातील व्यक्ती का नाही असा प्रश्‍न उदयनराजेंनी उपस्थित केला. 

ते म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची जागा कोणाची. आमच्या आजी आईसाहेबांनी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभी केली.. संस्थेवर मी नसू दे. शिवेंद्रराजेंना तरी घ्या. आम्हाला मेंबर तरी करुन घ्या. मेंबर कोणाला केले. प्रभाकर देशमुख द ग्रेट, दळवी साहेब आयुक्त, शशिकांत शिंदे चांगल आहे. निकष काय. जागा कोणी दिली.

ज्यांना घेतले त्यांचे योगदान काय. का आमच्यावर अन्याय असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. संस्थेच्या स्थापनेवेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितले होते जो मुख्यमंत्री असेल तो संस्थेचा अध्यक्ष असेल असेच ठरले होते. आता खासगीकरण झाल्याची टीकाही त्यांनी केले. मानहानी होती एवढीच खंत वाटते. 

प्रश्‍न : दिल्लीत उदयनराजेंना मान-सन्मान आहे म्हणून शरद पवार तुम्हांला साताऱ्यातून तिकीट देतात ? 

उदयनराजे : असले काही नाही... मी स्वतःच्या हिंमतीवर लढलो. पवारसाहेबांचा आदर करतो. तो राहणारच. कुणी असे समजू नये. मान्य करणारा उदयनराजे नाही. का करायाचे. कशासाठी. व्हाय. फक्त एकच आहे खरे बोलतो. खोटे बोलू शकत नाही. जे झालं ते झालं. ज्यांनी केलेय ना. त्यांनी भोगायला पाहिजे. मी सत्तेत होतो, नव्हतो. मी कामे करतो. अरे 5-50 इकडे तिकडे करु शकतो. प्रश्‍न मंत्रिपदाचा नाही. प्रश्‍न तत्वाचा आहे. तत्व आपण जर सोडले तर तुमची आमची ओळख काय राहणार. 

प्रश्‍न : असे म्हटले जाते लोकसभा आली की उदयनराजे टायमिंग साधतात ? 

उदयनराजे : पाळी आल्यानंतर लोक म्हणतात की दडून बसतात. त्यापैकी नाहीये मी. काय कुणाला बोलायचे ते बोलू दे. मला काय फरक पडतोय. पहिलांदाच सांगितले. 

प्रश्‍न : लोक म्हणतात जो पक्ष उदयनराजेंना तिकीट देईल. त्या पक्षाला महाराष्ट्रात फायदा होणार आहे, अशा वेळेस तुमची भूमिका काय ? 

उदयनराजे : अजून पाळी आलेली नाही. गेली 20 वर्ष आपण एकमेकांना ओळखतो. काय फरक पडला हो. लोक बदलले. एकडे तिकडे. हे ते. काय माझ्यात चेंज झाला. का बदल करु मी माझ्या स्वभावात. अजिबात नाही.

Web Title: because of Age silent otherwise it is not as bad as me says Udayan Raje Bhosale