अनैतिक संबंधामुळेच त्याने संपवले पत्नीला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

महाबळेश्वर : परपुरूषा बरोबर असलेले अनैतिक संबंधामुळेच अनिल सुभाष शिंदे याने त्याच्या पत्नी सिमा हिचा ११ वर्षांचा मुलगा आदित्य याच्या समोर धारधार शस्त्राने खुन करून स्वतः आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या संदर्भात अनिलची आई हिने काल त्या संबंधित पुरूषा विरोधात महाबळेश्वर पोलिसात आपला मुलगा अनिल याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे.

महाबळेश्वर : परपुरूषा बरोबर असलेले अनैतिक संबंधामुळेच अनिल सुभाष शिंदे याने त्याच्या पत्नी सिमा हिचा ११ वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासमोर धारधार शस्त्राने खुन करून स्वतः आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या संदर्भात अनिलची आईने मुलगा अनिल याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार काल त्या संबंधित पुरूषा विरोधात महाबळेश्वर पोलिसांकडे दाखल केली आहे. 
 
पत्नी सिमा हिचे परपुरूषा बरोबर शरीर संबंध असल्याची माहिती अनिलला होती. या कारणामुळेच अनिलने सिमा हिचा मोबाईल काढुन घेतला होता. पत्नीच्या अनैतिक संबंधा बाबत तो कमालीचा नाराज होता. त्या नैराश्यातुनच त्यांने पत्नीच्या हत्येचा कट रचला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. बुधवार ५ डिसेंबरला अनिल सुभाष शिंदे (रा. वडार सोसायटी ऑफिस जवळ, विश्रांत वाडी, धानोरी) पत्नी व मुलगा यांना बरोबर घेवुन महाबळेश्वर फिरायला आला होता. सुभाष चौकाजवळील एका लॉज मध्ये त्याने खोली घेतली होती.

मध्यरात्री १ वाजता पत्नी बरोबर भांडण झाले. या भांडणातुन चिडुन अनिलने पत्नीचा धारधार शस्त्राने गळा चिरला. तसेच ती रक्ताच्या थारोळयात कोसळल्या नंतर तिच्या पोटावर व पाठीवर असे एकुन २५ वार केले. यात पत्नी जागीच ठार झाली तर, नंतर अनिलनेही स्वतः त्याच शस्त्राने आपल्या पोटावर वार करून आत्महत्या केली. या संदर्भात अनिलवर खुनाचा गुन्हानोंद करण्यात आला आहे. या संदर्भात व पोलिसांना अनिलची कपडे व इतर साहित्याच्या तपासणीत खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठी मध्ये त्याने पत्नीच्या अनैतिक संबंधाचा उल्लेख केला आहे. त्याने चिठ्ठी लिहिली आहे की, ''माझी बायको सिमा हिचे पेनकर तगपन अंकल यांच्या बरोबर शरीर संबंध आहेत. आमच्या दोघांच्या मृत्युस पेनकर हाच जबाबदार आहे.'' या संदर्भात पोलिसांनी चौकशी व तपास सुरू केला आहे. 

दरम्यान, अनिलच्या आईने काल महाबळेश्वर पोलिस ठाण्यात येवुन चिठ्ठी बाबत माहिती घेतली. पेनकर याच्या विरोधात मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनिलच्या आईची तक्रार दाखल करून घेवुन पेनकर याचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Because of immoral relations He murders his wife