Bedgala became the residential center of MSEDCL
Bedgala became the residential center of MSEDCL

बेडगला महावितरणचे निवासी केंद्र बनले मध्यपी अड्डा 

आरग : बेडग (ता. मिरज) येथील महावितरण विद्युत उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या निवासी केंद्रामध्ये तळीरामांसह इतर उपद्रवी लोकांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. याचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होत आहे. 

येथील महावितरण उपकेंद्राच्या आवारात दहा वर्षापूर्वी कर्मचारी निवास केंद्र बांधण्यात आले होते. सुरुवातीस येथे कर्मचारी राहत होते. मात्र गेली पाच सहा वर्षांपासून येथील निवासी केंद्राची दुरवस्था झाली आहे. आवारात गवत, झाडे झुडपी मोठया प्रमाणात वाढली आहेत. निवासाची दरवाजे खिडक्‍याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्याचा फायदा मध्यपीनी घेतला आहे.

त्यामुळे रंगतदार पार्ट्यांना येथे उत आली आहे. तसेच येथील सहाय्यक अभियंता राहुल जेरीमल्ली हे जाणून बुजून फोन उचलत नसल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी या कडे जाणीवपूर्वक लक्ष घालावे अशी मागणी स्थनिक नागरिक करीत आहेत. 

दारू, सिगारेट, जुगार आद्याची मला माहिती नव्हती. निवासी केंद्रातील रंगतदार पार्ट्यांना आळा घालण्यासाठी त्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करण्यात येईल. तसेच महावितरणच्या परिसराला पुन्हा तारेच्या कंपाऊंडची मागणी करण्यात येणार आहे. 
- राहुल जेरीमल्ली, सहाय्यक अभियंता बेडग 

अशा घटना गावातील चांगल्या ठिकाणी घडणे अयोग्य आहे. महावितरणच्या निवासी केंद्राची स्वच्छता तसेच दुरुस्ती व्हावी. झाडी झुडपी गवत ही त्वरित काढावीत. येथील स्थानिक महिला व ग्रामस्थांना या घटनेचा नाहक त्रास होत आहे. 
- संभाजीराजे पाटील, अध्यक्ष युवक कॉंग्रेस, मिरज विधानसभा क्षेत्र

संपादन : प्रफुल्ल सुतार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com