मुलगी एकटीच असल्याचा अंदाज घेऊन दुपारी बाराच्या सुमारास आरोपी हरी सानप याने खेळत असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
कुंडल : पलूस तालुक्यातील एका गावात ऊस तोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Girl Abuse) करण्याची घटना घडली. याप्रकरणी कुंडल पोलिसांनी (Kundal Police) संशयित आरोपी हरी बबन सानप (वय ३५, रा. कासेवाडी, ता. आष्टी, जी. बीड) याला ताब्यात घेतले आहे.