Belagavi Kolhapur railway project update 2026
esakal
Belagavi to Kolhapur Railway Route Survey : बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक पथकाकडून मार्गाची पाहणी, जमिनीची मोजणी आणि आराखडा तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली (85 km Belagavi Kolhapur railway Project) आहे. या कामासाठी ड्रोन, जीपीएस यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पुण्यातील मोनार्क सर्व्हेयर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमिटेड या कंपनीकडे सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यासाठी सुमारे ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.