Belagavi : लग्नाचे आमंत्रण सोशल मीडियावर

डिजिटल लग्नपत्रिका; तरुणाईत वाढती क्रेझ
Belagavi
Belagavi Sakal

बेळगाव : यंदा लग्नाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाईन माध्यमांचा वापर आमंत्रण देण्यासाठी केला जात आहे. दूर अंतरावरील नातेवाईकांना, मित्रमंडळींना प्रत्यक्ष घरी जाऊन लग्नपत्रिका देणे अनेकांना अशक्य असल्याने आमंत्रण व कार्यक्रमांची पत्रिका मोबाईल व संदेशवरूनच पाठविली जात आहे. ऑनलाईन जमान्यात याचा वापर वाढला आहे. काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. यापूर्वी दुचाकी असो वा सायकलवरून प्रत्येकांना पत्रिका दिली जात होती. मात्र, सध्या फोन तसेच सोशल माध्यमावरून पत्रिका पोहचविली जात आहे.

व्हॉटस्‌ अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलीग्राम आदीच्या माध्यमातून आमंत्रण दिले जात आहे. दूर अंतरावरील नातेवाईक मित्रमंडळी आपल्या सोहळ्याला उपस्थित राहावे प्रत्येकाला वाटते. पण आमंत्रण देण्याची अडचण असते. मात्र, मोबाईलवरून सर्वांपर्यंत निरोप पोहोचविण्याचे काम वेगाने होत आहे. यासह अन्य कार्यक्रमांची वैशिष्ट्यपूर्ण लग्नपत्रिका छापण्याची क्रेझ काही ठिकाणी आजही आहे.

राजेशाही पद्धतीच्या पत्रिका ते नव्या तंत्राच्या आधारे तयार केलेल्या आकर्षक पत्रिका दिसत आहेत. डिजिटल व्हिउिओ स्वरुपातील पत्रिकाही सोशल माध्यमावरून फिरत आहे. यंदा नोव्हेंबरच्या आठवड्यापासून लग्नकार्याला सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अनेक मुहूर्त आहेत. अनेकांनी लग्नाची तयारी वेगाने सुरु केली आहे. यामुळे मोबाईल संदेश यंत्रणेचा वापर वाढला आहे.

डिजिटल लग्नपत्रिकेमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमी वेळेत पोहोचता येते. यापूर्वी लग्नाच्या आमंत्रणासाठी पोस्टाच्या पत्रांचा वापर केला जात होता. मात्र, पत्र फक्त नावापुरतीच उरली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com