Belagavi
Belagavi Sakal

Belagavi : चाबूक मोर्चाने समितीला निर्णायक बळ

रिंगरोडविरोधात प्रशासनाला शेतकऱ्यांची ताकद दाखविण्यात यश

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठविण्यासाठी मोर्चाचे आयोजन करते, मात्र सोमवारी काढलेला चाबूक मोर्चा प्रमाणात निघाल्याने येणाऱ्या काळात समितीला निर्णायक बळ मिळणार आहे. २०१२ नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाल्याची चर्चा आहे.

शहरातील वाहतूक कोंडी होत आहे, असे कारण देत रिंगरोड करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढे आणला आहे. यासाठी बेळगाव तालुक्यातील ३२ गावात भूसंपादन केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. रिंगरोड विरोधात शेतकऱ्यांची ताकद निर्माण करण्याचा निर्णय तालुका समितीने घेतला होता.

महिनाभर दररोज तालुक्यातील विवीध गावात जनजागृती केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची ताकद प्रशासनाला दाखवून देण्यात तालुका समिती यशस्वी झाली. समितीच्या आंदोलनात शहर आणि परिसरातील विविध संघटना आणि संस्था सहभागी झाल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वजण एक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सर्वच संघटनांनी केला, मात्र बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत. असताना राष्ट्रीय पक्ष गप्प आहेत.

पुढील काळात मते मागण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना जाब विचारणे गरजेचे आहे. असे मत अनेकांनी मोर्चावेळी व्यक्त केले. काही वर्ष तालुका समिती दोन गट निर्माण झाल्याचा फटका अनेक वर्षे समितीला बसला आहे. मात्र दोन्ही गट एकत्र येऊन अनेक दिवसांपासून काम करीत आहेत. त्यामुळेही तालुक्यातील जनतेचा समितीवरील विश्वास वाढला असून समितीचा रिंगरोडचा प्रस्ताव रद्द करू शकते. येणाऱ्या काळात तालुका समितीने संघटन बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच फक्त रिंगरोड नव्हे तर इतर योजनासाठी भूसंपादन करण्याच्या प्रयत्न झाला तर त्या विरोधातही आवाज उठवावा, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com