Belgaon: शहरातील वाढत्या वाहनांमुळे पार्किंगची समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील वाढत्या वाहनांमुळे पार्किंगची समस्या

बेळगाव : शहरातील वाढत्या वाहनांमुळे पार्किंगची समस्या

बेळगाव : शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पार्किंगला रस्तेही कमी पडू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. याकडे रहदारी पोलिसांनाही दुर्लक्षच केले आहे. याकडे रहदारी पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

बेळगाव शहरात अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. तरिही पार्किंगची समस्या आहे. शहरातील रामलिंगखिंड गल्ली, रिसालदार गल्ली, गोंधळी गल्ली, मारुती गल्ली आदी ठिकाणी रस्त्यावरच पार्किंग केले जाते. याचा फटका पादचारी व इतर वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: दुसऱ्या मुलाला डेट का करतेस म्हणत तरुणाची तरुणीला जीवे मारण्याची धमकी

तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरील पदपथावर खुलेआम खासगी वाहनांनी तळ ठोकला आहे. तसेच रस्त्यावर देखील वाहने लावली जातात. यामुळे नेहमीच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जातात. तरीही वाहतूक पोलिस याकडे दुर्लक्षच करताना दिसतात. बेळगाव शहरात बहुमजली पार्किंग स्थळ नसल्याचा फटका वाहतुकीला बसत आहे. बहुमजली पार्किग स्थळ झाल्यास त्या ठिकाणी चार चाकी वाहनांचे पार्किंग होण्यास मदत होणार आहे. याचा विचार महापालिकेने करून लवकरात लवकर पार्किंग स्थळ उभारावे अशी मागणी केली जात आहे.

बेळगाव शहरातील बाजारपेठेत नेहमी वर्दळ असते. ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. खरेदीसाठी आलेल्यांकडून दुचाकी किंवा चारचाकी वाहन बाजारात आणले जाते. अशा वेळी वाहतुक कोंडी होते. अनेकदा दुचाकी चालक रस्त्यावरच गाडी लावून दुकानात साहित्य घेण्यासाठी जातात. यावेळी वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. याचा त्रास नागरिकांनाच होतो.

loading image
go to top