बेळगाव : चिक्कोडीत दोन ठिकाणी घरफोडी

चोऱ्यांचे सत्र सुरूच : दोन पानपट्ट्याही फोडल्या
घरफोडी
घरफोडीsakal

चिक्कोडी : येथे चोरट्यांकडून दोन ठिकाणी घरफोडी झाली. तसेच दोन पानपट्ट्याही फोडल्या आहेत. या घटना गुरुवारी (ता. 23) पहाटे घडल्या. काही दिवसांपासून शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून चिक्कोडी पोलिसांनी चोरट्यांचा शोध चालविला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शहरातील सय्यद गल्ली आणि बुरुड गल्लीमधील बंद असलेली दोन पानपट्टीची दुकाने चोरट्यांकडून गुरुवारी पहाटे फोडण्यात आली. तेथून काही रक्कम व विविध साहित्य लंपास केले. तसेच दोन घरे फोडून सुमारे पाच ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. एकच रात्री चार ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण दिवसभर होते.

चिक्कोडी शहरात गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. राजीव नगरातील तीन घरे फोडण्याचा प्रकार ताजा आहे. त्यातील चोरट्यांचा शोध अजूनही लागलेला नाही. तोपर्यंत पुन्हा चोरट्यांनी परिसरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून त्यांचा माग घेण्यात येत आहे. चिक्कोडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com