
HSC Exam: बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 41 केंद्रावर बारावीची परीक्षा
बेळगाव : पदवी पूर्व शिक्षण खात्याने एप्रिल महिन्यात होणाऱ्या बारावी परीक्षेची तयारी सुरू केली असून यावेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ४१ केंद्रावर परीक्षा पार पडणार आहे. (Belgaum HSC Exam Updates)
काही दिवसांपूर्वी पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १६ एप्रिल पासून परीक्षेला सुरवात होणार आहे. परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सूचना पदवीपूर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राचार्यांची बैठक घेऊन केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी प्रमाणात असून यावर्षी २०००८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
हेही वाचा: Ukraine Russia War LIVE : रशियाचे ५ हजार सैनिक ठार, युक्रेनच्या दुतावासाचा दावा
यामध्ये वाणिज्य व कला शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून विज्ञान शाखेचे विद्यार्थी पाच हजाराहुन आहेत. यावर्षी बारावीचा निकाल आच वाढवावी यासाठी अनुसूचित जाती जमाती मधील विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच दररोज अधिक तास वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे.
शैक्षणिक जिल्ह्यातील ४१ केंद्रांवर बारावीची परीक्षा होणार असून बेळगाव शहरात परीक्षा केंद्राची संख्या अधिक प्रमाणात आहे. तर कित्तुर व खानापूर तालुक्यात परीक्षा केंद्रांची संख्या कमी आहे. ज्या केंद्रांवर परीक्षा होणार आहे. तेथील वर्ग खोल्यांची डागडुजी करण्यासह शौचालय, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आदी प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी आतापासूनच केंद्रांना आवश्यक त्या सूचना केल्या जात आहेत.19 फेब्रुवारीपासून बारावीच्या प्रॅक्टिकल परिक्षाना सुरवात झाली आहे त्यामुळे सध्या महाविद्यालयात एक्साम फिव्हर पहावयास मिळत असून सर्वच महाविद्यालयानी अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले आहे.
हेही वाचा: Ukraine: मुंब्र्यातील दोन विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला; पालक धास्तावले
कोरोनाच्या संकटामुळे 2020 व 2021 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली नव्हती. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्यात आले होते मात्र यावेळी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरवात केली आहे. महाविद्यालये विलंबाने सुरू झाल्याने अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा यासाठी अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. त्याचाही विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
Web Title: Belgaon Hsc Exam Center Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..