बेळगाव : पुतळा विटंबना निषेधार्थ सोमवारी निपाणी तालुका बंद | Belgaon Close | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nipani Close

बेळगाव : पुतळा विटंबना निषेधार्थ सोमवारी निपाणी तालुका बंद

निपाणी : बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची व बेळगाव येथे संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांचा निषेध करण्यासाठी सोमवारी (ता. २०) निपाणी तालुका कडकडीत बंद (Close) ठेवण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व संगोळ्ळी रायण्णा यांना अभिषेक, शहरात मूक मोर्चा काढून निषेध (Protest) करण्याचा निर्णय मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात झालेल्या सर्वपक्षीय व सर्व-जातीधर्माच्या शिवप्रेमाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये तालुक्यातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी काढण्यात येणारा मोर्चा शिवाजी महाराज चौक येथून जुने मोटार स्टॅंड, नेहरूचौक, कित्तूर चन्नम्मा सर्कल, निपाणी मेडिकल, छत्रपती संभाजी महाराज चौक, साखरवाडी नगरपालिकेमार्ग निपाणी तहसीलदार कार्यालयात जाणार आहे.

हेही वाचा: Novavax: नोव्हावॅक्स लस 90 टक्के कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी

माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, राज्यातीत सरकार झोपलेले आहे. महामानवांच्या पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असताना निद्रीस्तपणामुळे समाजविघातक कृत्य केले आहे. अशा समाजविघातकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सध्या अशा अनेक घटना घडू लागल्या आहेत. त्याना पाठिंबा देणारे राज्य सरकार दिशाभूल करत आहे. अधिवेशन काळात प्रश्न उपस्थित करून कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर यांना निवेदन देऊ. ते याप्रश्नी निश्चितच सभागृहात आवाज उठवतील.

माजी आमदार प्रा. सुभाष जोशी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्या पुतळ्याच्या विटंबनेने त्यांचे विचार मरत नाहीत. पुतळा विटंबना करणारी ही प्रवृत्ती समाजातून नष्ट होण्याकरीता समाजात जागृती झाली पाहिजे. यासाठी तालुक्यातील सर्वांनी एकत्र येवून सरकारला आपली ताकद दाखवावी.

लक्ष्मण चिंगळे यांनी, शिवाजी महाराज अवघ्या विश्वाचे दैवत आहेत. त्यांच्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या शक्तिचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी. सरकार आपले अपयश लपविण्यासाठी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिकारक संगोळी रायण्णांची विटंबना म्हणजे माणूसकीला फासणारी घटना असल्याचे त्यांनी सांगीतले. रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी, पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. या प्रकरणाची चौकशी होवून दोषींवर कडक कारवाई करावी. या घटनेच्या निषेधार्थ होणाऱ्या प्रत्येक उपक्रमात रयत संघटना सहभाग घेईल असे सांगितले.

हेही वाचा: PM मोदी म्हणतात, यूपी+योगी म्हणजे खूपच 'उपयोगी'!

यावेळी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, राजेश कदम, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब सरकार, सुनील पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, नगरसेवक संजय सांगावकर, दिलीप पठाडे, राजकुमार सावंत, शेरू बडेघर, सचिन लोकरे, नवनाथ चव्हाण, डॉ. जसराज गिरे, बाळासाहेब किलेदार आदींनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी नगरसेवक विनायक वडे, दत्ता नाईक, अशोक पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, अन्वर बागवान, महंमद पटेल, शरीफ बेपारी, अनिस मुल्ला, दीपक सावंत, प्रशांत नाईक, अशोक खांडेकर, रमेश भोईटे, अरुण आवळेकर, अरुण खडके, विजय -हाटवळ, पांडूरंग भोई, गणेश चव्हाण, बापू इंगवते, अस्लम शिकलगार, उत्तम कमते, संजय माने, नंदू कांबळे, धीरज गाडीवर यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती होती. सुधाकर सुधाकर यांनी आभार मानले.