esakal | बेळगाव : ‘व्हॅक्सीन’ डेपो अंतिम सुनावणी २२ सप्टेंबरला
sakal

बोलून बातमी शोधा

VACCINE DEPO

बेळगाव : ‘व्हॅक्सीन’ डेपो अंतिम सुनावणी २२ सप्टेंबरला

sakal_logo
By
महेश काशिद

बेळगाव : व्हॅक्सीन डेपोतील विकासकामांना स्थगिती कायम ठेवताना स्मार्टसिटी बेळगावकडून रोप लागवडीसाठी मागितलेली परवानगी बंगळूर उच्च न्यायालयात आज (ता.१४) नाकारण्यात आली. त्यामुळे ‘जैसे थे’ कायम ठेवण्याचे आदेश आहे. दरम्यान, दाव्याची अंतिम सुनावणी २२ सप्टेंबरला आहे.

व्हॅक्सीन डेपोतील बेकायदा विकासकामांच्या विरोधात बंगळूरला जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच या दाव्यात स्थगिती मिळाल्यामुळे व्हॅक्सीन डेपोत जैसे थे स्थिती आहे. त्यानुसार कोणतेही काम करण्यास मनाई आहे. आज दाव्याची पुढील सुनावणी होती. त्यात स्मार्टसिटी बेळगाव यांच्याकडून स्थगिती उठवली जावी आणि व्हॅक्सीन डेपोत रोप लागवडीसाठी किमान परवानगी मिळावी, अशी विनंती केली.

हेही वाचा: गौरी गणपतीच्या सजावटीतून ऑनलाइन शिक्षणाचा संदेश

त्याला याचिकाकर्त्यांचे वकील डॉ. किरण कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आणि रोप लागवडीला परवानगी मिळाल्यास योजनांची कामे हळूहळू हाती घेण्यात येतील, अशी शक्यता युक्तीवाद माध्यमातून व्यक्त केली. त्यावरती न्यायमुर्तींनी व्हॅक्सीन डेपोत कोणत्या स्वरुपाची विकासकामे सुरु आहेत, अशी विचारणा केली. त्यावर याचिकाकर्त्यांचे वकील कुलकर्णी यांनी एव्हीशन गॅलरी, आर्ट गॅलरी व विविध विकासकामे हाती घेण्यात आल्याची बाब न्यायमुर्तींच्या निदर्शनास आणून दिली. तसेच यापूर्वी व्हॅक्सीन डेपोत सुवर्णसौध उभाण्याची योजना होती. पण, पर्यावरणप्रेमी, रहिवाशांनी याविरुध्द आवाज उठविला आणि आक्षेप घेतला. परिणामी सुवर्णसौध हालगा-बस्तवाडला हलविले. यामुळे व्हॅक्सीन डेपो बोटॅनिकल पार्क म्हणून विकसीत करण्याचे ठरल्याचे सांगितले. यासाठी याची न्यायमुर्तींनी गंभीर दखल घेतली आणि स्मार्टसिटी बेळगावतर्फे झाडे लावण्यासाठी मागितलेली परवानगी नाकारली. दाव्याच्या पुढील सुनावणीची तारीख २२ सप्टेंबर आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. किरण कुलकर्णी व ॲड. सतीश बिरादार यांनी काम पहिले

loading image
go to top