बेळगाव एपीएमसीत जनावरांचा बाजार झाला सुरु...

सतीश जाधव
Saturday, 18 July 2020

एपीएमसीत दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. याठिकाणी बैल, म्हैशी, गाय खरेदी वक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात.

बेळगाव - कोरोनामुळे गत तीन महिन्यांपासून बंद असलेला कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) जनावरांचा बाजार गत दोन आठवड्यापासून सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे. मात्र, बाजाराला अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. बाजार सुरळीत होण्यासाठी अजून काही महिने अपेक्षीत आहेत.

एपीएमसीत दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. याठिकाणी बैल, म्हैशी, गाय खरेदी वक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात. बाजारातून दर शनिवारी लाखो रुपयांचा उलाढाल होते. मात्र, सध्या कोरोनामुळे बाजाराला कमी प्रतिसाद मिळत आहे. एपीएमसीकडून हा बाजार इतरत्र हलविण्याच्या हालचालीही होत आहेत. तोपर्यंत याच ठिकाणी बाजार भरणार आहे.

वाचा - हृदयद्रावक : पतीचा मृत्यू झाला, तिने तो मृतदेह हातीगाडीवरुन ढकलत नेऊन केले अंत्यसंस्कार...

कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊन होते. त्यामुळे हा बाजार बंदच ठेवण्यात आला होता. गत दोन आठवड्यापासून बाजार भरत आहे. बाजार बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागल्या. अनेक जण या बजारातून जनावरांची खरेदी करतो. पावसाळ्यात म्हैशीना घालण्यासाठी ओला चारा असतो. यासाठी म्हैशींची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. बाजारात म्हैशींची किंमत 30 हजारांपासून 80 हजारापर्यंत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदीही केली जात आहे. बाजारात शनिवारी 200 हून अधिक म्हैशी आल्या होत्या.

सध्या रोप लागवडीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. रोप लागवडीनंतर शेतीतील कामे पूर्ण होतात. यामुळे अनेक शेतकरी एपीएमसीतील बाजारात बैल विकतात. तसेच काही शेतकरी ओला चार असल्यामुळे बैलाची खरेदी करतात. 30 हजारापासून 80 हजारापर्यंत बैल जोडी बाजारात मिळत आहे. कोरोनामुळे फक्त 5 ते 6 जोड्या बाजारात विक्रीसाठी आणल्या होत्या. बाजारात गायींनाही मागणी असून 30 हजारापासून गायींना मागणी होती. 40 हून अधिक गायी बाजारात आल्या होत्या. तालुक्‍याच्या पूर्व भागासहीत पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांकडूनही एपीएमसीच्या बाजारात जनावरांची खरेदी केली जाते.

पावसाळा सुरु झाल्यामुळे शेतात ओला चारा मिळत आहे. यामुळे म्हैस खरेदी करण्यासाठी आलो आहे. कोरोनामुळे तीन महिने बाजार बंदच होता. सध्या सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना सोयीचे ठरत आहे.
- नारायण पाटील, शेतकरी

 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Belgaum apmc cattle market has been open for the last two weeks