महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

statue
महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख बनत आहे. सध्या शहरातील मूर्तिकारांकडे विविध महापुरुषांचे पुतळे तयार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली. त्यामुळे बेळगाव हे पुतळे तयार करण्याचे ‘हब’ बनले आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांत शहरातील मूर्तिकारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचे अनेक पुतळे तयार केले आहेत. (Belgaum News )

हेही वाचा: बेळगाव : आंतरराज्य वाहतूक सुरु राहणार

काही वर्षांपूर्वी अनेक लोक पुतळा बनवून घेण्यासाठी कोल्हापूर आणि इतर भागांतील मूर्तिकारांवर अवलंबून राहत होते. मात्र, शहरातील मूर्तिकार अतिशय चांगल्या पद्धतीचे पुतळे तयार करीत आहेत. त्यामुळे शहरातील मूर्तिकारांकडे पुतळ्यांची मागणी वाढली. गोवा, चंदगड, गडहिंग्लज, बीड, धारवाड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत पुतळे तयार करून पाठविले जात आहेत. तसेच, येणाऱ्या दिवसांत विविध भागांत बसविण्यात येणाऱ्या ८० हून अधिक पुतळ्यांची आगाऊ नोंदणी शहरातील मूर्तिकारांकडे करण्यात आली. दरवर्षी १५० हून अधिक पुतळे विविध भागांत पाठविले जात आहेत. त्यामुळे शहरातील मूर्तिकारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. विविध जयंतीचे औचित्य साधून विविध गावांमध्ये शिवपुतळे आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्यामुळे विविध महापुरुषांच्या जयंतीच्या अगोदर मोठ्या प्रमाणात पुतळे बेळगाव शहरातून पाठविण्यात येणार आहेत.

हेही वाचा: माईंच्या जाण्याने हजारोंचे मातृछत्र हरपले ; प्रभाकर देशमुख

दोन-तीन वर्षांपूर्वी ब्राँझपेक्षा फायबरच्या पुतळ्यांना अधिक मागणी होती. मात्र, अलीकडे ब्रॉंझच्या पुतळ्यांनाही मागणी वाढू लागली आहे. शहरातील मूर्तिकारांकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तयार करून घेण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे. तसेच, संगोळी रायण्णा, कित्तूर चन्नम्मा, महात्मा बसवेश्वर, संत कनकदास, धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्यांनाही अधिक मागणी आहे. उच्च दर्जाचे सुंदर पुतळे मूर्तिकार बनवीत असल्याने गेल्या काही महिन्यांत पुतळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विविध आकारांतील फायबर आणि ब्राँझचे पुतळे तयार करून घेण्यासाठी नोंदणी केल्यावर पाच ते सहा महिन्यांत आकारानुसार पुतळा तयार करून दिला जातो. फायबरचा पुतळा लवकर तयार होतो; तर ब्राँझचा पुतळा तयार करण्यासाठी अधिक दिवस लागतात. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करून घेण्याकडे नागरिकांचा कल आहे.

हेही वाचा: उमरगा : सावधान कोरोनाची तिसरी लाट दृष्टीक्षेपात !

आकडे बोलतात

  • शहरातील मूर्तिकारांकडे पुतळ्याची नोंदणी ८०

  • दरवर्षी तयार करून पाठविण्यात येणारे पुतळे १५०

  • शहरात पुतळे बनविणारे मूर्तिकार १००

  • ब्राँझचा पुतळा तयार करण्यासाठी लागणारा वेळ ५-६ महिने

एक नजरब्रॉंझच्या पुतळ्यांनाही मागणी वाढू लागली गोवा, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून मागणीउच्च दर्जाच्या सुंदर पुतळ्यांची मूर्तिकारांकडून निर्मिती२५ मूर्तिकार तयार करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तयार करून घेण्यासाठी अधिक नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर इतर महापुरुषांचे पुतळेही बनवीत असून, ब्राँझच्या पुतळ्यांची मागणी वाढत आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे मधल्या काळात मागणी घटली होती. मात्र, पुन्हा एकदा मागणीत वाढ झाली आहे.

- विक्रम पाटील, मूर्तिकार

Web Title: Belgaum Becomes Hub For Making Statues Of Great Men

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Paschim maharashtra
go to top