माईंच्या जाण्याने हजारोंचे मातृछत्र हरपले ; प्रभाकर देशमुख

अनाथ मुलांची माय होवून जगलेल्या सिंधुताई सपकाळ म्हणजेच माईंच्या जाण्याने हजारोंचे मातृछत्र हरपले
Sindhutai Sapkal
Sindhutai Sapkalsakal

दहिवडी : अनाथ मुलांची माय होवून जगलेल्या सिंधुताई सपकाळ म्हणजेच माईंच्या जाण्याने हजारोंचे मातृछत्र हरपले अशा शब्दात माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.प्रभाकर देशमुख म्हणाले, स्वतःकडे काहीही नसताना मायेचा पदर पसरुन माई अनाथांसाठी आभाळाएवढं काम करू शकतात तर मग आपण देखील समाजासाठी काही करायला हवे ही प्रेरणा त्यांच्या कामातून मला मिळाली. माईंची अनाथ मुलांसाठी मातृछत्र उभारतानाची तळमळ व धडपड मी पुण्यात जिल्हाधिकारी असताना पाहिलेली आहे.(Sindhutai Sapkal)

Sindhutai Sapkal
‘रॅलींना घाबरू नका; कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी संसाधने’

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याची प्रचिती देणारी, अनाथांना आईच्या मायेने जवळ करणारी व्यक्ती केवळ माईंच्यारुपाने जवळून पाहता आली. माझ्या वैयक्तिक जीवनात माई एक अनन्यसाधारण प्रेरणा होवून राहिल्या आहेत. त्यांच्या निधनाने मनाला खूप दुःख होत आहे. अनेक कार्यक्रमात मला त्यांना भेटता आले. त्यांची अनाथ मुलांना आधार देण्याची तळमळ, समाज सुधारकाच्या निर्मळ संवेदनशील मनोवृत्तीतून प्रत्यक्ष सामाजिक कार्यात प्रतिबिंबित झालेली होती. माईंच्याकडून झालेले सामाजिक काम एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सदैव समाजमनाला प्रेरणादायक राहणारे आहे.('Mother of orphans' Sindhutai Sapkal dies at 72)

Sindhutai Sapkal
भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, पुरोगामी सामाजिक सुधारणेतील एक अग्रगण्य पाऊल म्हणून माईंचे काम मानवतेचे दुर्मिळ दर्शन घडविणारे आहे. त्यांनी समाजातील अनेकांना सत्पात्री दातृत्वाचा धडा दिला आणि मानवी कल्याणाची जीवनगीता शिकविली. त्यांच्या कामाने समाजभान हरवलेली हजारो माणसे जागृत झाली. सरकारने त्यांना पद्मश्री देवून त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यांच्या हस्ते माण-खटाव मधील आदर्श माता / स्त्रिया जसे की माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री, चेतना सिन्हा यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले. भारतीय सामाजिक चळवळींच्या इतिहासात व सुधारणांच्या सुवर्ण पानांवर माईंचे काम चिरंतन स्मृतीत राहणारे आहे. त्यांच्या जाण्याने एक सामाजिक मातृछत्र हरपले.आज प्रभाकर देशमुख यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता यांची भेट घेवून सांत्वन केले.(Satara news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com