बेळगाव : फेक लोन ॲप पासून सावधान

हप्ता भरला नाही तर व्याजाला चक्री व्याज आकारले जाते.
Loan Apps Fraud
Loan Apps FraudSakal

बेळगाव : अलीकडे काही दिवसापासून बनावट लोन ॲपच्या माध्यमातून केवळ आधार कार्ड व पॅन कार्डवर क्षणार्धात हजारो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. मात्र, याना आरबीआयकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत मान्यता मिळालेली नाही. कर्ज घेतल्यानंतर दोन ते तीन पटीने पैसे भरावे लागतात. एखाद्यावेळी हप्ता भरला नाही तर व्याजाला चक्री व्याज आकारले जाते. तसेच धमकी व बदनामीही केली जात आहे. त्यामुळे अशा फेक लोन ॲप पासून सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

केवळ आधार कार्ड व पॅनकार्ड दिल्यास क्षणार्धात काही बनावट लोन ॲपच्या माध्यमातून गरजुना कर्ज दिले जात आहे. मात्र त्यासाठी भरमसाठ व्याज आकारण्यात येत आहे. झटपट कर्ज मिळण्याच्या आसेने विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांकडून कर्ज घेतले जात आहे. मात्र कर्जदाराकडून अधिक पैसे वसूल केले जात आहेत. हे लोन ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर संबंधितांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि माहिती परस्पर चोरली जात आहे. एखाद्यावेळी कर्ज भरले नाही तर संबंधितांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील लोकांना कर्जदाराबाबत व्हाट्सॲप आणि फेसबुकवर बदनामकारक माहिती पसरविण्याबरोबरच कर्जदाराचा फोटो एडिट करून तो व्हायरल करत मानसिक त्रास दिला जातो. यापुढेही जात तुमच्यावर क्रेमिनल नोटीस पाठवून कारागृहात पाठविण्यात येईल, असे धमकी तंत्र देखील अवलंबिले जात आहे. त्यामुळे बनावट लोन ॲपपासून सावध राहावे, व्याजाला चक्री व्याज भरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बनावट लोन ॲप

यूपीए लोन, एमआयरुपे, रुपे लोन, कॅश पार्क लोन, रूपे बॉक्स, आसान लोन, कॅश पॉकेट, कॅश ॲडव्हान्स, लोन होम स्मॉल, लेंन्ड मॉल, इझी लोन, मिनिट कॅश, हॅंड कॅश फ्रेंडली लोन, सन कॅश आनस्ट्रीम, इन्स्टा मनी मनी, स्टॅंन्ड प्रो फॉरपे ॲप, कॅश कॅरी पल, लोनझोम एटीओ लोन, कॅश कॅरी, ६६ कॅश, डेली लोन, अंडर आयबीआयएस स्कॅनर, युपीओ लोन डॉट कॉम, माय कॅश लोन, इअर्ली क्रेडीट ॲप, रिच कॅश, रुपीया बस, ॲगल लोन लोन साथी, गोल्ड कॅश, स्काय लोन, हॉलिडे मोबाईल लोन. क्विक लोन अॅप, रॉकेट लोन, बेस्ट पैसा, इझी बोरोव्ह कॅश लोन, रूपे मॅजिक, वालेट पे, हॅलो रुपे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com