बेळगाव : बसमधील CCTV बंद

महिलांची सुरक्षा ‘रामभरोसे’
CCTV
CCTV sakal

महिलांची सुरक्षा म्हणून परिवहन मंडळाच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. आज हे सर्व सीसीटीव्ही बंद असून, इतर बसमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना रेंगाळली आहे. एकीकडे बसमध्ये पाकीटमारीचे प्रसंग घडत असताना सीसीटीव्ही नसल्याने त्यांचा माग काढणेही अवघड ठरत आहे. त्यामुळे परिवहनचा सुरक्षित प्रवास केवळ नावापुरता ठरला.

- विनायक जाधव

सीसीटीव्ही बसविण्यामागचा उद्देश

२०१२ मध्ये दिल्ली येथे चालत्या बसमध्ये युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. ही घटना ''निर्भया हत्याकांड'' म्हणून संपूर्ण देशभर गाजली.‌ देशभरात विरोध झाल्याने महिलांची सुरक्षा म्हणून रात्रीच्या बसमध्ये होमगार्ड नियुक्त करण्यात आले. त्याच वेळी बेळगावात सर्व शहर बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या काही बसेससह बेळगाव शहराला जे-नर्म योजनेतून मिळालेल्या नव्या ४० मिनी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.‌ नंतरच्या काळात होमगार्ड नियुक्ती बंद झाली. तरी कॅमेरे मात्र सुरू होते. पण हळूहळू हे कॅमेरे बंद झाले असून नंतरआलेल्या नव्या बसेसमध्ये देखील कॅमेरे बसविण्यात आले नाहीत.‌

शहर सेवेसाठी केवळ जीपीएस

स्मार्टसिटी योजना अंतर्गत शहर सेवा देणाऱ्या केवळ ५६ बसमध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे शहर सेवेतील बस नेमकी कुठे आहे आणि किती मिनिटात कुठे पोहोचेल याची माहिती स्मार्ट सिटीच्या कमांडंट कंट्रोल युनिटला मिळते. शहरातील स्मार्ट बसथांबे निर्माण करताना बसची माहिती देखील प्रवाशांना बस थांब्यावर उपलब्ध व्हावी, यासाठी ही जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. स्मार्ट बसथांब्याची देखाल व्यवस्थित केली जात नसून जीपीएस सुविधेचा देखील म्हणावा तसा वापर होत नसल्याचे चित्र आहे.

दृष्टिक्षेपात...

शहर आगारात १५३ बस; पण केवळ ५६ बसमध्ये जीपीएस यंत्रणेचा वापर.

बेळगाव विभागात ७६० बस असून, केवळ ४० बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे; पण तेही बंद.

महिला सुरक्षा, बसमध्ये होणारी पाकीटमारी व चोरी थांबविण्यासाठी सर्व बसमध्ये सीसीटीव्हीची गरज

सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास महिला आरक्षित जागेवर बसणाऱ्या पुरुषांना ओळखणेही सोपे जाणार असून, त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करून महसूलही मिळविला जाऊ शकतो.

परिवहन मंडळाच्या काही मोजक्याच बसमध्ये पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पण, त्यानंतर ते कॅमेरे बंदच आहेत. सध्या शहर सेवेतील ५६ बसमध्ये जीपीएस बसविण्यात आले. बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा कोणताही नवा प्रस्ताव पुढे आलेला नाही.

-के.‌ के.‌ लमाणी, डीटीओ, परिवहन, बेळगाव विभाग

बसमध्ये अनेकदा पाकीटमारी, मंगळसूत्र लांबविणे असे प्रकार घडत आले आहेत. पण, चोरट्यांचा सुगावा लागत नाही. समोर महिलांना बसण्यासाठी आरक्षण असतानाही त्या ठिकाणी पुरुषच बसून असतात. असे प्रकार टाळायचे असतील तर त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षेचा विचार करून असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत.

- स्मिता पाटील, प्रवासी, बेळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com