बेळगाव : कॅण्टोन्मेंटचे स्मार्ट बसस्थानक अंधारात

कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्मार्ट रेल्वे स्टेशनसमोर स्मार्ट सिटीतून स्मार्ट बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे.
cantonment board smart bus stand
cantonment board smart bus standsakal
Summary

कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्मार्ट रेल्वे स्टेशनसमोर स्मार्ट सिटीतून स्मार्ट बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे.

बेळगाव - कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्मार्ट रेल्वे स्टेशनसमोर स्मार्ट सिटीतून स्मार्ट बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या सात महिन्यांपूर्वी या स्मार्ट बसस्थानकाचे उद्घघाटन करण्यात आले आहे. मात्र, अध्यापही हे स्मार्ट बसस्थानक अंधारातच आहे. बोर्डाच्या या दुर्लक्षाचा फटका प्रवाशांना बसत आहे. आता तरी याकडे लक्ष देऊन या ठिकाणी झगमगाट करावा अशी मागणी केली जात आहे.

स्मार्ट सिटीने वर्षभर लागून या स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. त्यांनतर गतवर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये या स्थानकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले. त्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर स्मार्ट सिटीकडून कॅण्टोन्मेंट बोर्डाकडे याचे हस्तांतरण करण्यात आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कॅण्टोन्मेंट बोर्ड याची देखभाल करीत आहे. मात्र, अद्यापही या ठिकाणी दुर्लक्षच झाले असल्याने नाराजी दिसून येत आहे.

या ठिकाणी पश्‍चिम भागातील किणये, नावगेसह, खानापूर, गोवा आदी भागातील बसेस या ठिकाणी थांबतात. यामुळे या थांब्यावर दिवसभर गर्दी असते. तसेच रात्री ९ वाजेपर्यंत या थांब्यावरून बसेसची ये-जा असते. या वेळीही येथे प्रवासी थांबतात. मात्र, या अंधारात चोरीच्या घटना घडल्यास याची जबाबदारी कॅण्टोन्मेंट बोर्ड घेणार का? अशी चर्चा रंगत आहे. पुढील काही दिवसात बोर्डाची बैठक होणार आहे. यामध्ये तरी हा विषय चर्चेला जाऊन येथील दिव्यांची समस्या निकालात काढावी अशी मागणी होत आहे. हेस्कॉमच्या उपकेंद्रातील दिव्यांचा प्रकाश या ठिकाणी पडतो. मात्र, अध्यापही येथील दिवे सुरु नाहीत. बोर्डाने लक्ष देऊन येथील दिवे सुरु करावेत अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com