बेळगाव : चित्रपटगृहे दोन वर्षांनंतर हाउसफुल्ल

निर्बंध हटल्याने सिनेमांचीही चलती; प्रेक्षकांसह कामगारांना अखेर दिलासा
Belgaum Cinema
Belgaum Cinemasakal

बेळगाव : गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनामुळे बेळगावातील चित्रपटगृहांना सुमारे २० महिने कुलूपच होते. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने तसेच निर्बंध हटल्याने चित्रपटगृहे हाउसफुल्ल होत असून, त्यांची गाडी रुळावर आली आहे. त्यामुळे चित्रपटगृहांना पुन्हा सुवर्णकाळ आला. यामुळे चित्रपटगृह चालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

देशभरात कोरोनामुळे २४ मार्च २०२० पासून लॉकडाउन लागू करण्यात आले. तेव्हापासून चित्रपटगृहे बंद होती. सहा महिन्यानंतर ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुमारे दोन महिने चित्रपटगृहे सुरू झाली. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा चित्रपटगृहे बंद करण्यात आली. बंद-चालू, बंद-चालू या खेळातच दोन वर्षे उलटली. मात्र, आता त्यांची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. मार्च २०२० मध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होते. मात्र, लॉकडाउन लागल्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते सिनेमे रिलीज करण्यात आले. सध्या चित्रपटगृहे सुरू झाल्याने हाउसफुल्ल गर्दीत नवीन सिनेमे दाखविले जात आहेत.

शहरात एकूण आठ चित्रपटगृहे असून, त्यात ग्लोब, आयनॉक्स, प्रकाश, स्वरूप-नर्तकी, चित्रा, संतोष-निर्मल आदींचा समावेश आहे.ज्यांना कोरोनाच्या कालावधीत लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला, तो फटका भरुन काढण्यास काही कालावधी नक्कीच जाणार आहे. दोन वर्षाच्या कालावधीत काम नसल्यामुळे चित्रपटगृहातील कामगारांनाही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. मात्र, आता त्यांनाही काम मिळाले आहे. बेळगाव शहरात सध्या पावनखिंड, द काश्मीर फाइल्स यासह काही कन्नड सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमांना गर्दी पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत सुमारे २० महिने चित्रपटगृहे बंद होती. आता चित्रपटगृहांना सुवर्णकाळ आला असून, पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. पुन्हा कोरोना, लॉकडाउनचे संकट येऊ नये, हीच अपेक्षा आहे.

- महेश कुगजी,संचालक, प्रकाश चित्रपटगृह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com