बेळगाव : न्यायालयाचा आदेश धाब्यावर; बायपासचे काम सुरूच

शेतकऱ्यांनी दिवानी न्यायालयासमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे पुरावे दिले होते.
court
courtsakal

बेळगाव : न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही काम सुरू ठेवण्यात आल्याबाबत शेतकऱ्यांनी दिवानी न्यायालयासमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे पुरावे दिले होते. त्यानंतर न्यायालयाने निकाल लागेल तोपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याची सूचना केली होती. तरीही शनिवारी काम सुरू ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कामाला स्थगिती मिळाल्यानंतर अनेक दिवस काम बंद राहील अशी अपेक्षा शेतकऱ्याची व्यक्त केली जात होती. मात्र स्थगिती आदेश असतानाही बायपासचे काम हाती घेतले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम सुरू असल्याबाबतची माहिती आणि फोटो दिवानी न्यायालयासमोर सादर केले होते. त्यानंतर अंतिम निकाल येईतो पर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु पुन्हा काम सुरू करण्यात आले होते याची माहिती मिळताच या भागातील शेतकरी संजय सुळगेकर, अनिल अनगोळकर आदी शेतकऱ्यांनी जाऊन तुम्हाला न्यायालयाचा आदेश मान्य नाही का कोणत्या आधारे काम सुरू ठेवण्यात आले आहे. अशी विचारणा करीत शिवारातून पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून काम बंद करण्यास सांगा अशी माहिती दिली त्यानंतर बायपासचे काम बंद ठेवण्यात आले आहे. मात्र अजूनही मशीनी शिवारात उभ्या करण्यात आल्या आहेत.

court
शेतकऱ्यांची आणखी एक मागणी मान्य, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!

बायपासबाबत दिवाणी न्यायालयात याचिका प्रलंबित असून याबाबत पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. यावेळी न्यायालयाकडून कोणता आदेश येतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. झिरो पॉइंट निश्चित केल्याशिवाय काम सुरू करू नये अशी सूचना करून देखील काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेत कामाला स्थगिती मिळवली आहे. तरीही काम सुरु केले जात असल्याने महामार्ग प्राधिकरण न्यायालयाचा आदेश मानत नसल्याचे असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. बायपासचे काम सुरू करण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा सातत्याने शेतकऱ्यांमधून दिला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com