बेळगाव : जिल्ह्यात ५८६ मुले गंभीर कुपोषित

पौष्टिक आहारासह आरोग्य सेवेची कमतरता
कुपोषित
कुपोषितsakal media

बेळगाव :शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील कुपोषितपणा कमी व्हावा यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तरीही बेळगाव जिल्ह्यात कुपोषित मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून सध्या बेळगाव जिल्ह्यात ५८६ मुले गंभीर कुपोषित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांतर्गत मुलांमध्ये पौष्टिकता वाढावी यासाठी सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवित आहे. तसेच या योजनांसाठी करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे. तरीही मुलांमध्ये कुपोषितपणा वाढतच असून लाखो रुपये खर्च करूनदेखील कुपोषित मुलांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे.

बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात ५३३१ अंगणवाडी केंद्रे आहेत. या अंगणवाडी केंद्रांमधून गर्भवती महिला व मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आणि अंडी वितरण केले जाते. मात्र, अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये धान्य वजन करण्याचे यंत्र उपलब्ध नाही. त्यामुळे किती प्रमाणात साहित्य वाटप केले जात आहे याची कोणतीही नोंद केली जात नाही. तसेच गर्भवती महिला व मुलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या धान्याचे योग्य प्रकारे वाटप केले जाते की नाही याकडेही दुर्लक्ष केले जाते.

कुपोषित मुलांना पौष्टिक आहार आणि योग्य प्रकारची आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यात कुपोषितपणा आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गंभीर कुपोषित व कमी कुपोषित मुलांपैकी १८ मुलांना एनआरसी केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र, सरकारने कुपोषितपणा का वाढत आहे, याची योग्य प्रकारे चौकशी करून येणाऱ्या काळात कुपोषित मुलांची संख्या वाढणार नाही याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील कुपोषित मुलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जी मुले कुपोषित आहेत अशा मुलांना अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पौष्टिक आहार पुरविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात कुपोषित मुलांची संख्या कमी व्हावी यासाठी विशेष उपक्रम राबविले जात आहेत.

- ए. एम. बसवराज, उपसंचालक, महिला आणि बालकल्याण

बेळगाव जिल्ह्यातील

कुपोषित मुलांची संख्या

विभाग संख्या

अंगणवाडी केंद्र ५३३१

गंभीर कुपोषित ५८६

कमी कुपोषित ३२०४४

एकूण ३२६३०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com