"या' जिल्हाधिकाऱ्यांनी का दिला आहे वीज तोडणीचा आदेश वाचा... 

belgaum district collector order power cut
belgaum district collector order power cut

बेळगावः मागील वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्‍यता असल्याने नागरिकांना पुन्हा महापुराचा सामाना करावा लागणार आहे. त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीचा सामाना करण्यासाठी सर्व विभागाने तयारी करावी, नाल्यांसह गटारींची स्वच्छता करून घ्यावी, त्याचबरोबर शहरामध्ये ज्या इमारतीची रेडिंग वीज मिटर तळमजल्यात असतील ती तातडीने पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत करण्याचे आवाहन करा. आणि कोणी हे करत नसेल तर संबंधित इमारतीची वीज जोडणी तोडा असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिले. 

जिल्हा पंचायतीच्या सभागृहात मंगळवारी (ता.26) पावसाळ्यापूर्वी खबदारी आणि उपायोजना करण्याबाबत महत्वाची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस खाते आणि अग्निशमन सर्व विभागीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन, पावसाळ्यात येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा करावी, नागरिकांची आपत्कालीन काळजी घेण्यासाठी नौका आणि पुनर्वसन केंद्रे सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले ओहत. 

स्थानिक स्वराज्य संस्थांनी नाले व गटारींची स्वच्छता करावी, रस्ते, सीडी व पुलांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तर आरोग्य विभागाने आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाने आवश्‍यक चारा साठा आणि लसीकरण तयार ठेवावे, आणि कृषी विभागानेही सर्व बाबतीत तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात लवकरच एनडीआरएफ पथक भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असुन जिल्ह्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या बोटींबाबत प्रस्ताव तयार करावा. तसेच, बोट त्वरित येण्यापूर्वी सर्व आवश्‍यक दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. 

नदीकाठावरील नागरिकांना आपत्कालीन बोटी आणि त्यांचे चालक तैनात करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली. शहरातील इमारतींची वीज मीटर ही तळघरात असतात, त्यामुळे पावसाळ्यात काही समस्या निर्माण झाल्यास वीज जोडताना अडचणी येतात, त्यामुळे मीटर स्थलांतरीत करण्याच्या सूचना हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या बैठकीला पोलिस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार, अशोक दुडुगुंटी, अतिरिक्त पोलिस आयुक्त जगदीश के. एच., पोलिस आयुक्त, अशोक थाली, कृषी विभागाचे सहसंचालक जिलानी मोकाशी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्या आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com