बेळगाव : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फ्लेस्क अज्ञातांनी फाडला

एकंदरीत खबरदारी म्हणून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 परिसरात कडक पोलीस बंदोबस्त
परिसरात कडक पोलीस बंदोबस्तsakal
Updated on

बेळगाव : काकतीवेस येथील आटोरिक्षा स्थानकानजिक लावण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फ्लेस्क अज्ञातांनी फाडला. शुक्रवार (ता.११) सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लागलीच खडेबाजार पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन फेडण्यात आलेला फ्लेक्स ताब्यात घेत तेथून अन्यत्र हलविला. घटनेच्या पार्श्वभूमीवर काकतीवेस परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 परिसरात कडक पोलीस बंदोबस्त
नाट्यमय घडामोडी; सा. रे. पाटील गटाचे सुभाष हेरवाडे सरपंचपदी बिनविरोध

गेल्या काही दिवसांपूर्वी काकतीवेस रोडवरील आटोरिक्षा स्टँडनजिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फ्लेक्स उभारण्यात आला होता. मात्र, अज्ञान समाजकंटकांनी गुरुवार (ता.१०) मध्यरात्री किंवा आज पहाटेच्या सुमारास सदर फ्लेक्स फाडून नुकसान केले. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून खडेबाजारचे पोलिस निरीक्षक दिलीप निंबाळकर हे पोलीस फौजफाट्यास घटनास्थळी दाखल झाले.

 परिसरात कडक पोलीस बंदोबस्त
साखर मिश्रीत गुळाला दराचा फटका

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी लागलीच त्यांनी सदर फ्लेक्स तेथून काढून अन्यत्र हलविला. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने हा प्रकार कोणी केला हे समजणे कठीण बनले आहे. एकंदरीत खबरदारी म्हणून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून हिजाब वरून वादंग सुरू असल्याने पोलीस सतर्क बनले आहेत. त्यातच ही घटना घडल्याने शहरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Marathi News Esakal
www.esakal.com